⚡ ब्रेकिंग News

'राजा शिवाजी'चा फर्स्ट लुक टीझर थिएटरमध्ये रिलीज; शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक

'राजा शिवाजी'चा फर्स्ट लुक टीझर थिएटरमध्ये रिलीज; शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक

'धुरंधर-द रिव्हेंज'सोबत प्रेक्षकांना पाहायला मिळणार छत्रपतींच्या पराक्रमाची सिनेमॅटिक झलक; अजय-अतुलचे संगीत, संतोष सिवनचे छायाचित्रण, १ मे २०२६ ला प्रदर्शन

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेची भव्य सिनेमॅटिक झलक आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेल्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'राजा शिवाजी'चा फर्स्ट लूक टीझर प्रेक्षकांसमोर आला असून, हा टीझर केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे.

विशेष म्हणजे, हा दमदार टीझर 'धुरंधर-द रिव्हेंज' या सिनेमाच्या प्रदर्शनासोबत दाखवण्यात येत असून, १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या पेड प्रिव्ह्यूद्वारे प्रेक्षकांना या ऐतिहासिक महाकाव्याची पहिली झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.

  भव्य दिमाखात साकारलीये छत्रपतींची गाथा

रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, त्यांचा पराक्रम आणि स्वाभिमान यांचे सिनेमॅटिक दर्शन घडवण्यात आले आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी रितेश विलासराव देशमुख यांच्याकडेच असून, संगीताची जादू अजय-अतुल यांनी फुलवली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी या गाथेला आपल्या अप्रतिम छायाचित्रणातून भव्य दृश्यरूप दिले आहे.

ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित 'राजा शिवाजी' हा चित्रपट भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडत भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या जन्मास अर्पण केलेली ही आदरांजली प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...