'भूत बंगला'चा नवं पोस्टर आऊट; अक्षय-राजपालची जोडी पुन्हा एकदा, प्रियदर्शनची दमदार कॉम्बिनेशन
भूलभुलैया चित्रपटानंतर राजपाल यादव आणि अक्षय कुमार यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेता राजपाल यादव यांच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. विशेषतः राजपाल यादव तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्या चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे. अशातच आता त्यांच्या आगामी चित्रपट 'भूत बंगला'चा नवा पोस्टर समोर आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
बालाजी मोशन पिक्चर्सने नुकताच या चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज केला आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता अक्षय कुमार एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे. पोस्टरमध्ये अक्षय कुमार झाडाच्या फांदीला उलटा लटकलेला दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर मजेशीर पण थोडासा भीतीदायक असा एक्सप्रेशन असून त्यात खट्याळपणा आणि वेडेपणाची झलक दिसते. मागे भीतीदायक जंगलाचा बॅकग्राऊंड आहे आणि आजूबाजूला वटवाघळे उडताना दिसतात. त्यामुळे या पोस्टरमधून चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होते. भूलभुलैया चित्रपटानंतर राजपाल यादव आणि अक्षय कुमार यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाची उत्सुकता वाढली
या चित्रपटातून अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. याआधीही या दोघांनी अनेक सुपरहिट कॉमेडी चित्रपट दिले आहेत, जे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर हे आहेत. 'भूत बंगला' हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजपाल यादव यांचे नाव ९ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणात चर्चेत आले होते. या प्रकरणात त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. बऱ्याच दिवसांपासून राजपाल यादव तुरुंगात होते. पण, सध्या त्यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. राजपाल यादव हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा, आपल्या कॉमेडीने सर्वांची मने जिंकणारे राजपाल यादव नेहमीच चाहत्यांच्या गळ्यातील ताईत राहिले आहेत. अशातच आता चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव कोणते पाऊल उचलणार, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष होते. 'भूत बंगला' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.