⚡ ब्रेकिंग News

गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा लेटेस्ट दर


  गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा लेटेस्ट दर

 सोन्याच्या दरात बदल नाही; चांदीवर ३ हजार रुपयांची सवलत, लग्नसिझनमध्ये ग्राहकांना दिलासा

राज्यातील सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात बदल झालेला नाही. दरम्यान, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ महाराष्ट्रातही बसत आहे. गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे अनेक रेस्टॉरंटला टाळे लावण्याची वेळ आली आहे. तसेच सोने आणि चांदीच्या दराचा आलेख कायम चढताच राहत होता. मात्र आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याच्या दराने भाव खाल्ले आहेत. राज्यातील सुवर्णनगरी अर्थात जळगावात सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे भाव जैसे थे आहेत. तर, चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. ग्राहक सोन्याच्या दरात घसरण होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, अशी नोंद आहे. तर, चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

जळगावात सोन्याचे दर किती?

आज ११ मार्च २०२६ रोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे भाव जैसे थे आहेत. १ तोळा सोन्याचे दर १,६०,५०० रुपये इतके आहेत. काल सोन्याच्या दरात वाढ झाली होती. १० मार्च २०२६ रोजी सोन्याचे दर इतकेच होते. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर, १० तोळे सोने खरेदीसाठी आपल्याला १६,०५,००० रुपये मोजावे लागतील. त्यामुळे सामान्यांच्या मनात सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चांदीवर ३ हजार रुपयांची घसरण

दरम्यान, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. १ किलो चांदीच्या दरात ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला २,७३,००० रुपये मोजावे लागतील. लग्नसोहळा किंवा सणांसाठी तुम्ही चांदीचे दागिने करू इच्छित असाल, तर आज चांदी खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते.

मुंबईत सोन्याचे दर किती?

आज ११ मार्च २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ९३० रुपयांची वाढ झाली आहे. १ तोळा सोने खरेदीसाठी आपल्याला १,६३,३१० रुपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ९,३०० रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळे सोने खरेदीसाठी आपल्याला १६,३३,१०० रुपये मोजावे लागतील.

तर, २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८५० रुपयांची वाढ झाली आहे. १ तोळा सोने खरेदीसाठी आपल्याला १,४९,७०० रुपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८,५०० रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळे सोने खरेदीसाठी आपल्याला १४,९७,००० रुपये मोजावे लागतील.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...