⚡ ब्रेकिंग News

हडपसरमध्ये आमदार चेतन तुपेंवर कार्यकर्त्यांचा निशाणा; 'लेकाला नगरसेवक का?' म्हणत फडकवले बॅनर

  हडपसरमध्ये आमदार चेतन तुपेंवर कार्यकर्त्यांचा निशाणा; 'लेकाला नगरसेवक का?' म्हणत फडकवले बॅनर

 अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळला; कार्यकर्त्यांनी घराणेशाहीवर उठविला आवाज

पुण्यातील हडपसर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरद्वारे आमदार तुपे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत असंतोषाचे हे नवीन उदाहरण समोर आले आहे.

बॅनरमधील आरोप काय? 

हडपसरमध्ये लागलेल्या बॅनरमध्ये आमदार चेतन तुपे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांनी आपली व्यथा मांडताना म्हटले आहे की, कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे आमदारकी मिळाली, पण त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ऐवजी आपल्याच लाडक्या लेकाला युवक शहराध्यक्ष केले गेले. आता पक्षाच्या वाट्याला येणारे स्वीकृत नगरसेवक पदही त्याच लेकाला देण्याचा बालहट्ट का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

बॅनरमध्ये पुढे म्हटले आहे की, "आमदार साहेबांच्या भूमिकेमुळे हडपसरमध्ये पक्षाची पिछेहाट झाली. ती बाजूला सारून आता लाडक्या लेकासाठी नगरसेवक पदाची धडपड सुरू आहे. हे कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. अजितदादा गेल्याने आम्ही पोरके झालो आहोत. त्यातच हा अन्याय सुरू आहे."

कार्यकर्त्यांचे पार्थ पवारांकडे प्रश्न 

या बॅनरमध्ये कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनाही आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, "वहिनीसाहेब (सुनेत्रा पवार) आणि पार्थ दादा, तुम्ही या गोष्टींची माहिती घ्या. आम्ही तुम्हाला अजितदादांच्या रूपात बघतोय. तुम्हीही दादांसारखं आम्हाला न्याय द्या."

अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या रिक्ततेचा फायदा घेत काही नेते आपला स्वार्थ साधत असल्याचा आरोप या बॅनरद्वारे करण्यात आला आहे. पैसे घेऊन पक्षविरोधी काम करणाऱ्या आणि कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्या या लोकांपासून पक्षाची मुक्तता व्हावी, अशी मागणीही या बॅनरमधून करण्यात आली आहे.

पुण्यातील राजकारण तापले

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...