⚡ ब्रेकिंग News

पुण्यात हळदीच्या पाकिटांतून गांजाची तस्करी; पोलिसांकडून दोन भावांना बेड्या, १६ किलो साठा जप्त!

पुण्यात हळदीच्या पाकिटांतून गांजाची तस्करी; पोलिसांकडून दोन भावांना बेड्या, १६ किलो साठा जप्त!

बाणेर परिसरात उच्चभ्रू भागातच रॅकेटचा पर्दाफाश; दोन्ही आरोपी खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू बाणेर (बाणेर) परिसरात हळदीच्या पाकिटांच्या आडून गांजाची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात बाणेर पोलिसांनी अभिषेक भिका बोरसे आणि अक्षय भिका बोरसे या दोन भावांना अटक करत तब्बल १६ किलो गांजा जप्त केला आहे.

गोपनीय माहितीवरून सापळा

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात दोन तरुण दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महापालिकेच्या जलतरण तलावाजवळ सापळा रचला. संशयितांना अडवून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील पिशवीत हळदीची पाकिटे आढळून आली.

हळदीच्या पाकिटात गांजा

या पाकिटांची तपासणी केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. कारण हळदीच्या नावाखाली या पाकिटांमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३ किलो गांजा जप्त केला.

पिंपरी-चिंचवडमधून अधिक साठा जप्त

चौकशीदरम्यान आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या घरात आणखी अमली पदार्थ साठवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकत आणखी १३ किलो गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण १६ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपी खासगी कंपनीत नोकरीला

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली असून ते हळदीच्या पाकिटांचा वापर करून गांजाची विक्री करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.

सोसायटीत प्रवेश रोखला म्हणून वॉचमनवर हल्ला; पुण्यातील काळेपडळमध्ये धक्कादायक प्रकार

पुण्यातील हडपसरमधील मोहम्मद वाडी परिसरात एका सोसायटीबाहेर वॉचमनवर काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या दोघांना सोसायटीत प्रवेश नाकारल्याने त्यांनी संतापून वॉचमनवर हल्ला केला. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली असून मारहाणीत वॉचमनच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सोसायटी गेटबाहेरील या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काळेपडळ पोलीस ठाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...