सातारा : जिल्हा परिषदेत सर्वाधिक २७ जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी हालचाली तीव्र केल्या. हॉटेल फर्नमध्ये मंत्र्यांसह नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
नेत्यांची बैठक
शिवसेना मंत्री शंभुराजे देसाई, राष्ट्रवादी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. "ZP सत्ता स्थापनेसाठी प्राथमिक चर्चा," असं मकरंद पाटील यांनी सांगितलं. शंभुराजे देसाई यांनी दुजोरा दिला. बहुमतासाठी ३३ जागा हव्या; राष्ट्रवादी (२०) + शिवसेना (१५) = ३५ ने बहुमत पार.
पक्षीय बलाबल (जिल्हा परिषद)
पक्ष जागा
भाजप २७
राष्ट्रवादी काँग्रेस २०
शिवसेना (शिंदे) १५
काँग्रेस १
इतर २
एकूण ६५
पंचायत समिती (१३० गण)
तालुका भाजप राष्ट्रवादी शिवसेना इतर
सातारा १० ५ १ -
जावली ३ १ २ -
वाई ३ ५ - -
महाबळेश्वर - २ २ -
खंडाळा १ ५ - -
फलटण ५ ३ ८ -
माण ५ ५ - -
खटाव ८ ६ - -
कोरेगाव १ ९ २ -
कराड १६ ४+१ (शरद) १+२ (काँ.) -
पाटण १ - १३ -
एकूण ५३ ४५ २९ ३
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती यशस्वी होईल का, याकडे लक्ष लागलं आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.