म्हसवडमध्ये वेल्डिंग करताना कामगाराचा मृत्यू
म्हसवड, ता. माण : म्हसवड शहरातील मायणी चौक परिसरात वेल्डिंगचे काम करत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
पोलिसांच्या नोंदीनुसार, प्रमोद सुभाष साळुंखे (वय ३१, मूळ रा. यशवंतनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर; सध्या रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) हे ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मायणी चौक येथील जोगेश्वरी वेल्डिंग वर्क्ससमोर पाण्याच्या टँकरमध्ये वेल्डिंगचे काम करत होते.
यावेळी त्यांना अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी म्हसवड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे.


Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.