क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. संजय राऊत यांच्या नव्या पुस्तकाचं नाव "बोध कीर्तन" असं आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर पोस्ट करत नव्या पुस्तकाबाबत माहिती दिली आहे.
संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग' हे पुस्तक गेल्या वर्ष १७ मे २०२५ रोजी प्रकाशित झालं होतं. 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाला वाचकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता संजय राऊत यांनी नव्या पुस्तकासंदर्भात माहिती दिली आहे.
संजय राऊत यांचं 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लोकप्रिय ठरलं होतं. 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन मुंबईत झालं होतं. तर, इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन राजधानी नवी दिल्लीत झालं होतं. 'नरकातला स्वर्ग' पुस्तकानंतर आता संजय राऊत यांचं नवं पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे. या पुस्तकाचं नाव "बोध कीर्तन" असं आहे.
"बोध कीर्तन" हे खासदार संजय राऊत यांचं मेहता पब्लिकेशनकडून दुसरं पुस्तक प्रकाशित केलं जाईल. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या माझ्या पुस्तकाची छोटीशी झलक! 'एक अनोखे पुस्तक!' अशा शब्दात एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांनी नव्या पुस्तकासंदर्भात माहिती दिली आहे.
'बोध कीर्तन' या पुस्तकात तुरुंगातील काही अनुभव, त्यासोबतच प्रेरित करणारे किस्से आणि इतर बरेच काही पुस्तकात असेल. संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं स्वागत कशा प्रकारे केलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पुस्तकाचा कव्हर फोटो संजय राऊत यांनी पोस्ट करत या पुस्तकासंबंधीची माहिती दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात २०१४ मध्ये भाजपनं केंद्रात मिळवलेली सत्ता, ईडीच्या देशभरातील कारवाया, ईडीकडून संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई, तुरुंगातील प्रसंग, तुरुंगातून सुटका झाल्यानंतरचे अनुभव, कुटुंबीयांची साथ अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं.
संजय राऊत यांच्या त्या पुस्तकाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. 'बोध कीर्तन' या पुस्तकात देखील संजय राऊत यांच्याकडून तुरुंगातील काही अनुभव आणि त्यासंदर्भातील किस्से मांडले जाणार असल्यानं या पुस्तकाचं प्रकाशन कधी होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत हे केवळ राजकारणी नसून एक सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचं लेखन स्पष्ट, बेधडक आणि वास्तववादी असल्याचे ओळखले जाते.
'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याला वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या पुस्तकात संजय राऊत यांनी त्यांच्या तुरुंगवासाचे अनुभव आणि त्यामागील राजकीय घडामोडींचा वेध घेतला होता. पुस्तकाची मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही आवृत्त्या प्रकाशित झाल्या होत्या.
| मुद्दा | तपशील |
| नवं पुस्तक | 'बोध कीर्तन' |
| लेखक | संजय राऊत |
| प्रकाशक | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| आधीचं पुस्तक | 'नरकातला स्वर्ग' (१७ मे २०२५) |
| नव्या पुस्तकात | तुरुंगातील अनुभव, प्रेरक किस्से, इतर मुद्दे |
| कव्हर फोटो | सोशल मीडियावर प्रसिद्ध |
| प्रकाशन तारीख | लवकरच जाहीर होणार |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.