⚡ ब्रेकिंग News

"अंधभक्तांची जमात फोफावत चाललीय, त्यांना कायद्याची भीती राहिली नाही का?" बिहारमधील जमुई येथील प्रकाराबाबत रोहिणी खडसेंकडून संताप व्यक्त


  १० वीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग; 'तथाकथित संस्कृती रक्षकां'वर कडक कारवाईची मागणी; सिंहगडावरील ८ वर्षांच्या चिमुरडीच्या घटनेचा दाखला; 'झोम्बी बनतील' असा इशारा; राष्ट्रीय महिला आयोगाची दखल; ३ आरोपींना अटक

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

जळगाव / जमुई (बिहार) - बिहारच्या जमुई जिल्ह्यात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "ही अंधभक्तांची जमात आहे, ही जमात फोफावत चालली आहे."

बिहारमधील जमुई जिल्ह्यात एका बाईकवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला काही समाजकंटकांनी रस्त्यात अडवून त्यांच्याशी असभ्य वर्तन आणि छेडछाड केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रोहिणी खडसे यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, बिहारमधील हा व्हिडिओ प्रचंड मन हेलवून टाकणारा आणि त्यासोबतच चीड आणणारा आहे.

"दहावीत शिकणाऱ्या मुलीचा या तथाकथित 'संस्कृती रक्षकांनी' अक्षरशः विनयभंग केला आहे," असे त्या म्हणाल्या

रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्रातील गेल्या महिन्यातील एक उदाहरण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिले आहे. "असाच एक प्रकार महाराष्ट्रातही मागे घडला होता. ८ वर्षांची चिमुरडी सिंहगडावर बरमूडा घालून पर्यटनासाठी आली होती म्हणून तथाकथित संस्कृती रक्षकांनी तिच्या वडिलांसोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली होती."

पुढे त्या म्हणाल्या, "ही अंधभक्तांची जमात आहे, ही जमात फोफावत चालली आहे. यांना कोण प्रोत्साहन देत आहे? यांना कायद्याची भीती राहिली नाही का?"

"शासनाने यांच्यावर जरा कारवाईचा बडगा उगारावा, नाहीतर हे अंधभक्त उद्या झोम्बी बनतील आणि सरकारमधील लोकांनाच आपले लक्ष करतील," असा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रीय महिला आयोगाने बिहारच्या जमुई जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीसोबत आणि तिच्या साथीदारासोबत घडलेल्या प्रकाराची नोंद घेतली आहे.

अल्पवयीन मुलीची छेड काढणे, मारहाण करणे, चुकीच्या पद्धतीने थांबवणे, विनयभंग करणे या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी बिहारच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

व्हिडिओ फुटेजच्या आधारे सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करावी. निश्चित कालमर्यादेत निष्पक्ष चौकशी करावी, असेही राष्ट्रीय महिला आयोगाने सांगितले आहे.

जमुईच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जमुईचे पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल यांनी ABP News सोबत फोनवर बोलताना या प्रकरणी माहिती दिली आहे.

पीडित मुलीच्या जबाबानुसार १९ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली आहे.

पोलीस अधीक्षकांनी व्हिडिओच्या फ्रेममध्ये ६-७ लोक दिसत असल्याचे म्हटले. यापैकी काही लोकांची ओळख पोलिसांनी पटवली असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर तीन आरोपींना अटक केली आहे.

| मुद्दा | तपशील |

| घटना | बिहार, जमुई जिल्हा – अल्पवयीन मुलीशी छेडछाड |

| तारीख | १९ सप्टेंबर २०२६, सायंकाळी ७ वाजता |

| आरोपी | ६-७ जण; ३ जणांना अटक |

| रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया | 'अंधभक्तांची जमात फोफावत आहे' |

| दुसरा दाखला | सिंहगडावर ८ वर्षांच्या चिमुरडीशी असभ्य वर्तन |

| राष्ट्रीय महिला आयोग | एफआयआर नोंदवण्याचे निर्देश, निष्पक्ष चौकशी |

| पोलीस अधीक्षक | विश्वजीत दयाल, जमुई |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...