'विखे, फडणवीस, शिंदे तळतळाट घेऊ नका'; 'नाहीतर तुमच्या हातात अधिकार राहणार नाहीत'; उद्यापासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन; मुंबईकडे कूचाचा इशारा
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज (२८ ऑगस्ट) शेवटचा दिवस असून, त्यांनी उद्यापासून (२९ ऑगस्ट) पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार, विशेषतः उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.
जरांगे म्हणाले, "संध्याकाळपर्यंत बघू काय होतंय. कुणीतरी आपल्याला भेटायला येईल, या आशेवर समाज मोठा होत नसतो. माझं मराठा समाजाला आवाहन आहे. विखे पाटलांनी काल संभाजीनगरला आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की अर्ज नाहीये. तुम्ही अर्ज दिलेले माहितीय मला, पण ते आपल्यालाच उलटं बदनाम करतायत. मराठ्यांमध्ये उदासीनता आहे, असं ते म्हणतायत. ते आपल्याला हिणवतायत."
त्यांनी मराठा समाजाला आवाहन करताना सांगितले, "तुम्ही घरात बसून राहू नका, बाहेर पडा आपल्या लेकरा-बाळांसाठी. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, मुलांचं वाटोळं करू नका. आपल्यातला आळस, मरगळ सगळी झटकून टाका. ज्या मराठ्यांनी अर्ज दिले पण जे स्वीकारले गेले नाहीत, त्यांनी या. ज्यांची नोंद सापडली, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही, त्यांनी या."
जरांगे पुढे म्हणाले, "संध्याकाळपर्यंत बघू काय करतात. काही नाही ते, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. ज्यांना भेटायचं ते येतील, माझी क्षमता आहे. २९ ऑगस्टच्या आंदोलनामध्ये एकही गोष्ट मागे ठेवणार नाही. देवेंद्र फडणवीस जसे सांगतात, तसं विखे बोलत आहेत. ते सांगत आहेत की मराठ्यांमध्ये उदासीनता आहे."
"ज्यांची नोंद सापडली, तरी अधिकाऱ्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिले नाही किंवा अर्ज घेतला नाही, त्यांनी अंतरवालीमध्ये या. आताच चान्स आहे. पाऊस-पाणी नाही, नोकरी नाही. किमान शेतात काही चुकलं नाही, तर नोकरीत काहीतरी मिळेल. विखे यांना हे दिसत नाही. कलेक्टरला घेऊन बसतात."
जरांगे यांनी विखेंना सल्ला देताना म्हटले, "मी त्यांना सांगितलं होतं – तुम्ही कलेक्टरला घेऊन न बसता, तहसीलदारांना घेऊन बसा. तुम्ही एसडीएमला आणि जात पडताळणी अधिकाऱ्याला घेऊन बसा. विखे, तुम्ही पागल झालात की मराठे तुम्हाला पागल करायचे आहेत? इथे तुम्ही शहाणे व्हा. मराठे चिडले तर... विखे, फडणवीस, शिंदे तळतळाट घेऊ नका."
जरांगे म्हणाले, "विखेंना उपसमितीवर आणून ठेवलं. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करू नये. खालचे मंत्री नीट रहा. मराठा समाजाला फडणवीस आणि शिंदे यांनी दिलं, पण वाटोळं पण करत आहेत. एक वर्ष मी फडणवीस यांना बोललो नाही, शिंदेंना दोन वर्षे बोललो नाही. तुम्ही वाटोळं करत आहात, हे तुमच्या ध्यानात आणून देत आहोत."
विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना जरांगे म्हणाले, "त्याला काहीच माहित नाही. त्याला काहीच कळत नाही. त्यांना कारखाना, त्यातून साखर बारीक का जाड निघाली, गूळ निघाला की ढेकळ निघाला, एवढंच कळतं."
त्यांनी मंत्री बावनकुळे यांच्या एका दाव्याचाही उल्लेख केला. "बावनकुळे २२ लाख म्हटले. यांना विचारलं तर एवढे नसतील, ते म्हणाले. अन् तुम्हाला मराठ्यांचा देव व्हायचं? इथे तुम्हाला मराठ्यांच्या उपसमितीचा अध्यक्ष केलं. तुम्ही किती वेड्यात काढणार, किती फसवणार आहात?" असा सवाल त्यांनी केला.
जरांगे म्हणाले, "नोंदी ५८ लाख आम्ही शोधल्यात. हे मीडियासमोर आम्ही वदवून घेतले होते. यांना ५८ लाखांमधील नोंदी कमी करायच्या आहेत." त्यांनी मंत्र्यांना सावध केले, "विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, लाड भाऊ – तुम्ही सावध व्हा. चांगला, योग्य जीआर मराठ्यांना देऊन टाका. नाहीतर तुम्हाला अधिकारामध्ये आम्ही ठेवणार नाही. नाहीतर तुमच्या हातात अधिकार राहणार नाहीत."
मुंबईतील आंदोलनाबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "संभ्रम ठेवत नाही. २९ ऑगस्टला अंतरवालीमध्येच आंदोलन होणार. यांनी दिलं नाही, तर मुंबईत होणार. पाच टप्प्यात सहा कोटी मराठा मुंबईत जाणार," असा दावा त्यांनी केला.
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करत आहेत. राज्य सरकारने यापूर्वीही काही आश्वासने दिली होती, मात्र जरांगे पाटील यांच्या मते त्यांची पूर्तता झालेली नाही. कुणबी नोंदी सापडूनही अनेक मराठा तरुणांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाला पुन्हा वेग दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 'आळस झटकून टाका' असे आवाहन करत २९ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यावर कडक शब्दांत टीका केली असून, नोकरीच्या संधी न मिळाल्यास पाच टप्प्यांत सहा कोटी मराठे मुंबईत जाणार असल्याचा इशारा दिला आहे. आता राज्य सरकार या आंदोलनाला कसा प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजातील उत्साह आणि सरकारची भूमिका यावर पुढील काळातील राजकीय घडामोडी अवलंबून असतील. ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा निर्माण करणारी आहे. मराठा समाज संघटित होऊन आंदोलनाला कसा प्रतिसाद देतो, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरेल. राज्य सरकारसमोर ही एक मोठी आव्हानात्मक परिस्थिती आहे, कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. पुढील २४-४८ तास राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सर्वांचे लक्ष अंतरवाली सराटीकडे आणि मुंबईकडे आहे. राज्य सरकार या परिस्थितीला कसे सामोरे जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे आणि आता प्रत्यक्ष कार्यवाहीकडे वळले आहेत. या घडामोडींचा परिणाम राज्याच्या सत्तासमीकरणावरही होऊ शकतो. आगामी काळात या मुद्द्यावर राजकीय पक्षांच्या भूमिका स्पष्ट होतील. सध्या मात्र, सर्वांचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील हालचालींकडे आहे. मराठा समाजाचा मोर्चा कुठवर जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.