⚡ ब्रेकिंग News

शिवसेना पक्षांतरानंतर ओमराजेंच्या गडात आज उद्धव ठाकरेंची गर्जना; शिवसैनिकांकडून जय्यत तयारी, स्वागताच्या बॅनरची जोरदार चर्चा

धाराशिवमध्ये 'निष्ठेची वज्रमूठ' मेळावा; हातात रायफल घेतलेल्या संजय राऊतांच्या बॅनरची चर्चा; ओमराजेंच्या बंडानंतर पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे . दुसरीकडे पक्षांतर केलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाहीर सभा घेत आहेत. अशातच अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत . दुपारी तीन वाजता शहरातील सिताई मंगल कार्यालयात होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे .

ओमराजे विरुद्ध ठाकरे – राजकीय संघर्ष तीव्र

उद्धव ठाकरेंनी हिंगोली आणि परभणीत सभा घेतल्यानंतर आता थेट ओमराजे निंबाळकर यांच्या बालेकिल्ल्यात धाराशिवमध्ये पाऊल ठेवले आहे . याला ‘निष्ठेची वज्रमूठ’ मेळावा असे नाव देण्यात आले आहे . या सभेनंतर धाराशिवच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.

ओमराजे यांनी बंड केल्यानंतर आता ठाकरेंचे जुने शिवसैनिक एकवटायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. अखंड शिवसेना असताना जिल्हाप्रमुख राहिलेल्या अनिल खोचरे यांच्या मुलाकडून आता ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. अनिल खोचरे सध्या शिंदेंकडे असल्याने ठाकरेंच्या स्वागतासाठी मुलाने लावलेल्या बॅनर्जी आता चर्चा आहे .

संजय राऊतांच्या 'रायफल' बॅनरची चर्चा

फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर विरोधात आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. ठाकरे काय बोलणार यासोबतच संजय राऊत काय बोलणार याकडेही शिवसैनिकांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच हातात रायफल घेऊन उभे असलेले संजय राऊत यांचे बॅनर सभास्थळावर लागले आहेत . राऊतांच्या निशाण्यावर ओमराजे आहेत. 'सौ दाऊत, एक राऊत' या राऊतांच्या लोकप्रिय घोषणेसह हातात रायफल घेतलेले बॅनर आहेत . त्यामुळे आज ते कसा निशाणा साधणार, याकडे लक्ष लागलं आहे.

 ओमराजेंनी पक्षांतर का केले?

ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पक्षांतराचे स्पष्टीकरण देताना विरोधी पक्षात असताना विकास निधीची कमतरता आणि सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यात असमर्थता या कारणांचा उल्लेख केला होता . त्यांनी आपल्या मतदारसंघातील समर्थकांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते . मात्र, ते सुप्रीम कोर्टात वडिलांच्या हत्याप्रकरणाच्या निकालाला आव्हान देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे .

 ठाकरेंच्या दौऱ्याचा उद्देश

उद्धव ठाकरे यांचा हा दौरा बंडखोर खासदारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन संघटना पुन्हा उभी करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा आहे . पक्ष सोडून गेलेल्या खासदारांनी आपले राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढावी, असा संदेशही ठाकरे या दौऱ्यातून देणार आहेत .

शिवसेना (UBT) मधील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट ओमराजे निंबाळकरांच्या बालेकिल्ल्यात जाऊन 'निष्ठेची वज्रमूठ' मेळावा घेतला आहे. हातात रायफल घेतलेल्या संजय राऊतांच्या बॅनरमधून ओमराजेंवर निशाणा साधण्याचे संकेत मिळत आहेत. धाराशिवमध्ये शिवसैनिकांनी आपल्या पक्षप्रमुखाच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली आहे. आता या सभेत उद्धव ठाकरे फुटीर खासदारांवर काय हल्लाबोल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेनंतर धाराशिवच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे .




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...