⚡ ब्रेकिंग News

सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी जयदीप भोसले यांची निवड; नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा

 


सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी जयदीप भोसले यांची निवड; नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा

सांगली: सांगली जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी आणि सभागृहात पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये गटनेतेपदी जयदीप (भैय्या) भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात जयदीप भोसले यांचा दांडगा जनसंपर्क आणि कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या ताकदीत वाढ होईल, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला आहे.

नूतन पदाधिकारी कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

  • गटनेते: जयदीप (भैय्या) भोसले

  • सचिव: ॲड. सौ. शीतलताई अमोलदादा बाबर

  • उपाध्यक्ष: संताजी रघुनाथ मेटकरी

  • खजिनदार: सौ. मनिषा प्रकाश बागल

या निवडीनंतर जिल्हा परिषद आवारात समर्थकांनी जल्लोष केला. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले. ॲड. शीतलताई बाबर आणि सौ. मनिषा बागल यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेतील महिला नेतृत्वालाही बळ मिळाले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...