⚡ ब्रेकिंग News

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्यात १० हजारांची तर चांदीत २० हजारांची घसरण; खरेदीदारांना मोठा दिलासा


 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्यात १० हजारांची तर चांदीत २० हजारांची घसरण; खरेदीदारांना मोठा दिलासा

 युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याने सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

मुंबई: सोने-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात एकाच दिवसात १० हजार रुपयांची घसरण झाली, तर चांदीच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची घसरण झाली. दर कमी झाल्याने सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी वाढत्या दरात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

सोन्याच्या दरात किती घसरण?

आज सकाळी बाजार उघडताच सोन्याचे दर (जीएसटीशिवाय) १ लाख ५५ हजार रुपयांवर होते. बाजार बंद होताना हे दर १ लाख ४६ हजार रुपयांवर आले आहेत. तर चांदीच्या दरात २ लाख ५० हजार रुपयांवरून २ लाख ३० हजार रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.

घसरणीमागची कारणे काय?

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे. तसेच डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याचा परिणाम म्हणून अनेक देशांत सोने-चांदीतील गुंतवणूक अन्य ठिकाणी वळवली जात असल्याचे मानले जात आहे. युद्धाची तीव्रता वाढल्यास सोने-चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२०२६ मध्ये सोने-चांदीच्या दरात वाढ का?

२०२६ मध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री केल्याने आणि अमेरिका-इराण यांच्यातील तणाव वाढल्याने दर वेगात वाढत आहेत. जागतिक राजकारणात संघर्ष निर्माण झाल्यास गुंतवणूकदार सोने आणि चांदीकडे वळतात. २०२६ मध्येही २०२५ प्रमाणेच सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ कायम आहे.

चांदीच्या दरवाढीमागे औद्योगिक कारणेही आहेत. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चांदीचा औद्योगिक वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे चांदीच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे.

सोने-चांदीचे दर कोण जाहीर करते?

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. देशभरात सोने-चांदीचे दर सर्वत्र सारखेच असतात. IBJA कडून दिवसातून दोन वेळा दर जाहीर केले जातात. हे दर जीएसटी आणि मेकिंग चार्जेसशिवायचे असतात.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...