⚡ ब्रेकिंग News

बारामतीत मोठा ट्विस्ट! सुनेत्रांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देण्याचा वडेट्टीवारांचा इशारा

बारामतीत मोठा ट्विस्ट! सुनेत्रांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देण्याचा वडेट्टीवारांचा इशारा

'शरद पवार गटाने उमेदवार न दिल्यास काँग्रेस लढवेल निवडणूक'; सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीतच नवा तणाव, लक्ष्मण हाकेच्या उमेदवारीने लढत और रंगात येणार?

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या चाणक्यनीतीत मोठा उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली भूमिका आता काँग्रेसला मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देण्याचा इशारा देत राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली आहे.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना मोठे वक्तव्य केले. "शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) बारामतीत उमेदवार देणार नसेल, तर काँग्रेस या जागेवर निवडणूक लढवण्याबाबत विचार करेल," असे वडेट्टीवार म्हणाले.

सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवरून आघाडीत धुसफूस

सुप्रिया सुळे यांनी 'सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार कसा देणार?' अशी भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस नेत्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. "पवार विरुद्ध पवार अशी लढत यापूर्वी झाली आहे. ही जागा राष्ट्रवादीची असली तरी, पक्ष फुटीच्या वेळी काँग्रेसशी चर्चा केली गेली नव्हती. आता निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळे यांची ही भूमिका महाविकास आघाडीची भूमिका म्हणून मान्य केली जाऊ शकत नाही," अशी ठाम भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.

बारामतीकडे सर्वांचे लागले लक्ष

दरम्यान, बारामतीची ही पोटनिवडणूक आता तिरंगी लढतीकडे वाटचाल करताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेसने उमेदवारीची शक्यता वर्तवली असताना, दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. लक्ष्मण हाके यांनी सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर पाठवून, अजित पवार यांच्या घरातील व्यक्तीशिवाय दुसरा उमेदवार उभा करण्याची मागणी केली आहे. "सुनेत्रा पवारांना बिनविरोध विधान परिषदेवर पाठवा. इथं आम्ही निवडणूक लढवून जिंकून दाखवू," असे आव्हान हाके यांनी केले आहे. त्यामुळे बारामतीची लढत आता अधिक रंगात येण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...