⚡ ब्रेकिंग News

भाजपच्या विजयानंतर राष्ट्रवादी-शिवसेनेचा निषेध; फुटलेल्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करणार.

 
भाजपच्या विजयानंतर राष्ट्रवादी-शिवसेनेचा निषेध; फुटलेल्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करणार.

 साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी भाजपला मतदान केले. राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना पोलिसांनी अटक केल्याने ते मतदान करू शकले नाहीत. यामुळे भाजपने ३३ मतांसह विजय मिळवत प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी तर राजू भोसले यांना उपाध्यक्षपदी संधी दिली. या निकालामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधी पक्षांनी प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

फुटलेल्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "जे सदस्य फुटले, अशा सदस्यांवर अपात्रतेची कारवाई निश्चित होणार आहे. आज लोकशाहीचा खून झाला. इतक्या खालच्या पातळीला या जिल्ह्याचे राजकारण याआधी कधीही झालेलं नाही. हीन पातळीवर आज राजकारण केलं गेलं आहे."

पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना मकरंद पाटील म्हणाले, "पोलीस बळाचा वापर करून खोटेनाटे गुन्हे दाखल केले गेले आहेत. सभागृहापाशी गेल्यावर आमची हातापायी झाली. दोन मंत्र्यांच्या अंगावर पोलीस येत असतील तर त्याच्यापेक्षा महाराष्ट्र दुर्दैव असू शकत नाही."

शशिकांत शिंदे यांचा निषेध

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या प्रकरणी आरोप केले. ते म्हणाले, "आपण निवडून येत नाही हे कळाल्यानंतर हे केलेलं षडयंत्र आहे. यामध्ये प्रशासन, पोलीस यंत्रणा सर्व सामील आहेत. मतदान बजावण्याचा अधिकार असतानाही पोलिसांनी मतदान करण्यासाठी आलेल्या सदस्यांना सभागृहापासून दूर नेणं हे लोकशाहीत बसत नाही."

शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, "सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचं राजकारण आजपर्यंत पाहिलेलं नाही, ते भाजपने करून दाखवलेलं आहे. सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक केलेली आहे. त्याचा निषेध करतो."

शंभूराज देसाई यांची भूमिका

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, "पोलीस भाजपचे मांडलिकत्व पत्कारल्यासारखं वागले आहेत. युतीच्यावतीनं पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचा धिक्कार करतो, निषेध करतो. समारोप करताना मी एवढंच सांगेन, या प्रकरणाची सुरुवात भारतीय जनता पक्षानं केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेची युती करेल."

सातारा जिल्हा परिषदेचे संख्याबळ

| पक्ष | सदस्यसंख्या |

| भाजप | २७ |

| राष्ट्रवादी | २० |

| शिवसेना | १५ |

| काँग्रेस | १ |

| अपक्ष | २ |

| एकूण | ६५ |

आजच्या निवडणुकीत फुटलेले सदस्य

राष्ट्रवादी काँग्रेस:

 लता कर्णे – (बुध, खटाव)

 ऋतुजा जगताप – (फलटण)

 कामेश कांबळे – (सातारा)

अनिल देसाई (माण) आणि संदीप मांडवे (खटाव) यांना पोलिसांनी जिल्हा परिषद परिसरातून सकाळी अपहरणाच्या गुन्ह्याखाली उचलून नेले.

शिवसेना:

 हणमंत जगदाळे – (कोरेगाव कुमठे)

 सारिका फाळके – (सातारा रोड)

अंतिम मतसंख्या:

 भाजप – ३३

 शिवसेना / राष्ट्रवादी / स्वाभिमानी / काँग्रेस – ३०

पुढील राजकीय दिशा

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. फुटलेल्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली गेल्यास पुढील काळात या निवडणुकीचे राजकीय पडसाद उमटणार आहेत. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या भूमिकेमुळे हे प्रकरण आता केवळ सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय बनले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...