⚡ ब्रेकिंग News

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी संगीता पाटील यांचा दणदणीत विजय; भाजप युतीचा पराभव

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी संगीता पाटील यांचा दणदणीत विजय; भाजप युतीचा पराभव

अजित पवार गटातील चार सदस्यांची महाविकास आघाडीला पाठिंबा; शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर

सांगली: सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (महाविकास आघाडी) संगीता पाटील यांनी भाजप युतीच्या उमेदवार स्वप्नाली मासाळ यांचा पराभव करत इतिहास रचला. संगीता पाटील यांना 34 मते मिळाली, तर स्वप्नाली मासाळ यांना केवळ 25 मते मिळवता आली.

हा निकाल राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेनेचे दोन सदस्य मतदानापासून गैरहजर राहिले, ज्यामुळे भाजप युतीच्या उमेदवाराचे नुकसान झाले. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील चार सदस्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत संगीता पाटील यांच्या पारड्यात मत टाकले, तर दोन सदस्य भाजपसोबत गेले. या राजकीय घडामोडींमुळे सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...