⚡ ब्रेकिंग News

अध्यक्षपदी प्रिया शिंदे, उपाध्यक्षपदी राजू भोसले; धक्काबुक्की, पोलिसी कारवाई, मंत्र्याला दुखापत; राजकीय वातावरण तापले.


अध्यक्षपदी प्रिया शिंदे, उपाध्यक्षपदी राजू भोसले; धक्काबुक्की, पोलिसी कारवाई, मंत्र्याला दुखापत; राजकीय वातावरण तापले.

सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने मोठा राजकीय डाव साधत सत्ता हस्तगत केली. भाजपच्या प्रिया शिंदे या अध्यक्षपदी तर राजू भोसले उपाध्यक्षपदी विजयी झाले. मात्र, या निवडीदरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. धक्काबुक्की, पोलिसी कारवाई आणि मंत्र्यांच्या जखमी होण्यापर्यंत गेलेल्या हाय-व्होल्टेज ड्रामामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सातारा जिल्हा परिषदेत हाय-व्होल्टेज ड्रामा

सातारा जिल्हा परिषदेत भाजपने बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नसतानाही अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर झेंडा रोवला. निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत असलेल्या दोन सदस्यांना जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आरोपही करण्यात आला. या गोंधळात मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हाताला दुखापत झाली.

साताऱ्यातील नेते काय म्हणाले?

प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून ही निवड जिंकण्यात आल्याचा आरोप करत शंभूराज देसाईंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर मंत्री मकरंद पाटील म्हणाले, "दोन मंत्र्यांवरच पोलीस धावून येत असतील, तर याहून मोठं दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही..." या घटनेमुळे सत्ताधारी आघाडीतच मोठा विसंवाद उघड झाल्याचे स्पष्ट होत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी "सुरुवात त्यांनी केलीय, आम्ही शेवट करणार" असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे मंत्री काय म्हणाले?

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोलिस कारवाईशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. "तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई केली असेल, तो त्यांचा विषय आहे," असे सांगत त्यांनी स्वतःला या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे, भाजपकडून मात्र हा विजय संख्याबळाच्या जोरावरच झाल्याचा दावा करण्यात आला. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, "जिल्हा परिषदेत आमचंच बहुमत होतं, त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर आमचाच अधिकार होता." तसेच, निवड प्रक्रियेदरम्यान शंभूराजे देसाई यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोपही गोरे यांनी केला आहे.

सातारा जिल्हा परिषद एकूण संख्याबळ (६५)

| पक्ष | सदस्यसंख्या |

| भाजप | २७ |

| राष्ट्रवादी | २० |

| शिवसेना | १५ |

| काँग्रेस | १ |

| अपक्ष | २ |

आजच्या निवडणुकीत फुटलेले सदस्य

राष्ट्रवादी काँग्रेस (भाजपला मतदान)

 लता कर्णे – (बुध, खटाव)

 ऋतुजा जगताप – (फलटण)

 कामेश कांबळे – (सातारा)

शिवसेना (भाजपला मतदान)

 हणमंत जगदाळे – (कोरेगाव कुमठे)

 सारिका फाळके – (सातारा रोड)

पोलिसांनी उचलून नेलेले सदस्य

पोलिसांनी जिल्हा परिषद परिसरातून सकाळी अपहरणाच्या गुन्ह्याखाली राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना उचलून नेले:

 अनिल देसाई – (माण)

 संदीप मांडवे – (खटाव)

अंतिम मतसंख्या

भाजप – ३३

शिवसेना / राष्ट्रवादी / स्वाभिमानी / काँग्रेस – ३०

पुढील राजकीय दिशा

सातारा जिल्हा परिषदेत भाजपने सत्ता काबीज केली असली तरी या निवडीदरम्यानचा गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीत तणाव वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. फुटलेल्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. या राजकीय संघर्षाचे पडसाद येणाऱ्या काळात साताऱ्याच्या राजकारणात उमटणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. साताऱ्यातील या सत्तानाट्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढे हा वाद किती वाढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...