⚡ ब्रेकिंग News

गुन्हा दाखल होताच परदेशात पळण्याचा होता प्लॅन; पोलिसांनी वेळीच 'लूक आऊट' नोटीस काढून हवाई मार्ग बंद केले; 'चोर शिरल्याचा बनाव' करत घरातून धरला.


 गुन्हा दाखल होताच परदेशात पळण्याचा होता प्लॅन; पोलिसांनी वेळीच 'लूक आऊट' नोटीस काढून हवाई मार्ग बंद केले; 'चोर शिरल्याचा बनाव' करत घरातून धरला.

भोंदू 'कॅप्टन' खरातचा ऑस्ट्रेलियात पळण्याचा डाव उधळला! पोलिसांनी रोखली परदेश वारी, पोलिसांनी कसं राबवलं ऑपरेशन खरात? वाचा इनसाईड स्टोरी

नाशिक : अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये करणाऱ्या भोंदू अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' खरातच्या मुसक्या आवळण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठी खेळी केली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच खरातने देशाबाहेर पळ काढण्याचा चंग बांधला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हालचाली करत त्याचे परदेशात पळण्याचे सर्व रस्ते बंद केले. पोलिसांनी आखलेल्या 'स्मार्ट' प्लॅनची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात आश्रय घेण्याचा होता प्लॅन

मिळालेल्या माहितीनुसार, खरातला पोलिसांच्या अटकेची दाट शक्यता वाटू लागली होती. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याची जय्यत तयारी केली होती. खरातचे परदेशात अनेक संबंध असल्याने तिथे स्थायिक होऊन पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ही हालचाल सुटली नाही.

९ मार्चला जारी झाली होती 'लूक आऊट' नोटीस

खरात विमानतळावरून परदेशात झेपावण्याआधीच नाशिक पोलिसांनी ९ मार्च रोजी त्याच्याविरोधात 'लूक आऊट सर्क्युलर' (एलओसी) जारी केली. या नोटीसमुळे खरातचे 'हवाई' पलायनाचे सर्व मार्ग बंद झाले आणि त्याला देशांतर्गतच राहावे लागले. पोलिसांची हीच खेळी निर्णायक ठरली. जर पोलिसांनी वेळीच लूक आऊट नोटीस काढली नसती, तर हा हाय-टेक भोंदू बाबा आज परदेशात असता आणि त्याला भारतात परत आणणे कायदेशीररीत्या कठीण झाले असते.

पोलिसांनी कसं राबवलं ऑपरेशन खरात?

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अशोक खरातला अटक करण्यासाठी वेगळाच डाव आखला होता. 'चोर शिरल्याचा बनाव' करत पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचत त्याला घरातूनच बेड्या ठोकल्या. ही कारवाई अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचे समोर येत आहे.

आरोपी राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव केला. चोराला पकडण्यासाठी पोलीस परिसरात झडती घेत असल्याचे सांगत पथकाने विविध ठिकाणी तपास सुरू केला. याचाच भाग म्हणून काही पोलिसांनी खरातच्या घराचीही तपासणी सुरू केली. दरम्यान, घरात उपस्थित असलेल्या अशोक खरातला पाहताच पोलिसांनी क्षणार्धात कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या. या अनपेक्षित हालचालीमुळे आरोपीला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.

गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. १८) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पेन ड्राइव्हमध्ये सापडले ५८ व्हिडिओ

दरम्यान, कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता पोलिसांना एक पेन ड्राइव्ह मिळाला. त्यामध्ये तब्बल ५८ व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली असून, या व्हिडिओंची सखोल चौकशी सुरू आहे. या पुराव्यांमुळे तपास अधिक गंभीर व व्यापक होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. १८ मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले.

कोण आहे अशोक खरात?

अशोक खरात हा नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीमधून निवृत्त अधिकारी असून, अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांच्या कारकिर्दीत खरातने १५४ देशांचे दौरे केले आहेत. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठीच्या उपायांसाठी अशोक खरातच्या संपर्कात असतात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...