⚡ ब्रेकिंग News

युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा फोन; ओमान आणि कुवेतच्या नेत्यांशी चर्चा



  युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा फोन; ओमान आणि कुवेतच्या नेत्यांशी चर्चा

आखाती देशांतील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष; परराष्ट्र मंत्रालयाकडून स्थितीचा आढावा सुरू

नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल संघर्षाने थेट युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशातील दोन प्रमुख नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबह यांच्याशी पंतप्रधानांनी च  युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा फोन; ओमान आणि कुवेतच्या नेत्यांशी चर्चा
  परिस्थितीची माहिती घेतली.

 भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा

आखाती देशांत लाखो भारतीय नागरिक वास्तव्यास असून अनेक भारतीय पर्यटकही सद्यस्थितीत तेथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी दोन्ही नेत्यांशी चर्चा करताना संबंधित देशांतील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच त्या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या अनिवासी भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यांच्या स्थलांतरणासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 रमजानमधील संघर्षाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट

यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत भूमिका स्पष्ट करताना रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती भागातील संघर्ष वाढणे दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. या संघर्षात अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे आणि त्याबद्दल भारताने तीव्र शोक व्यक्त केला आहे.

आखाती भागातील बदलत्या परिस्थितीवर भारत सरकार सातत्याने लक्ष ठेवून असून राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आवश्यक ते निर्णय घेत राहील, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

आखाती भागात सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास असून तेथे काम करतात. त्यांच्या सुरक्षेला आणि कल्याणासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या प्रदेशातील कोणत्याही नकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतावर होऊ शकतो, याचीही चिंता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

 दूतावासांकडून मदतकार्य सुरू

संघर्षग्रस्त देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नागरिकांशी सातत्याने संपर्कात असून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत. अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

दरम्यान, इराण आणि आखाती भागातील देशांमध्ये लढाऊ विमानांचे हल्ले आणि स्फोट सुरू असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. भारत सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...