⚡ ब्रेकिंग News

५८ व्हिडिओ म्हणजे ५८ महिलांवर अत्याचार!"; अशोक खरात प्रकरणी रुपाली पाटलांचे चाकणकरांवर गंभीर आरोप

५८ व्हिडिओ म्हणजे ५८ महिलांवर अत्याचार!"; अशोक खरात प्रकरणी रुपाली पाटलांचे चाकणकरांवर गंभीर आरोप

"राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पदावर राहिल्यास पुरावे नष्ट करतील"; राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा, सुनेत्रा पवारांकडे लक्ष वेधणार

नाशिक: तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याच्या बलात्कार प्रकरणाने आता राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. गुन्हे शाखेने खरातच्या कार्यालयातून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल ५८ व्हिडिओ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

रुपाली ठोंबरे यांचा गंभीर आरोप

रुपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, "हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नाही, तर हा महिलांचा विषय आहे. मी एक वर्षापूर्वीच या प्रकरणाची वाचा फोडली होती. मात्र, या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर यांचे नियंत्रण असल्याने पोलीस कारवाई करू शकले नाहीत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठोंबरे पुढे म्हणाल्या, "५८ व्हिडिओ म्हणजे ५८ महिलांवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तातडीने पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. रुपाली चाकणकर या पदावर राहिल्यास पुरावे नष्ट करतील," असा गंभीर आरोप त्यांनी केला.

राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन

रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, "जर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही, तर आम्ही संपूर्ण राज्यभर आंदोलन करू. या विषयाबाबत सुनेत्रा पवार यांच्या कानावरही आम्ही हा विषय टाकणार आहोत. संविधानिक पदावर असल्यामुळे तपास योग्य प्रकारे होणार नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीने रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा."

अशोक खरात प्रकरण काय?

अशोक खरात याच्यावर ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने बुधवारी (१८ मार्च) पहाटे त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये तब्बल ५८ व्हिडिओ आढळून आले आहेत. हे व्हिडिओ महिलांशी संबंधित असल्याची शक्यता पोलीस तपास करत आहेत.

अशोक खरात हा मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला असून, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. गेल्या काही वर्षांत त्याने 'कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट' आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून नाव कमावले होते.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...