आटपाडीत हाकेमळा शाळेच्या किचन शेडचे उद्घाटन; 'आदर्श माता' व 'आदर्श महिला' सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
आटपाडी: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हाकेमळा येथे महिला दिनाचे औचित्य साधून नवीन किचन शेडचे उद्घाटन आणि समाजातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील आणि आटपाडी नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. संध्याताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या वतीने 'आदर्श माता' आणि 'आदर्श महिला' पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अनिल शेठ पाटील यांनी शालेय उपक्रमांचे कौतुक केले, तर सौ. संध्याताई पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. नवीन किचन शेडमुळे विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनाची सोय अधिक चांगल्या पद्धतीने होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी संतोष पाटील, समाधान लिंगे, चंद्रकांत हाके, विशाल नागणे, अमोल आदाटे, बाळासाहेब हाके, संतोष मोटे, विक्रम पुजारी, भारत हाके यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षिका, मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.