⚡ ब्रेकिंग News

गावठी कट्ट्यातून सहा गोळ्या झाडल्या; सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक

 

गावठी कट्ट्यातून सहा गोळ्या झाडल्या; सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक

नाशिक कारागृहातून महिनाभरापूर्वीच सुटला होता गुंड; अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारी वाद चिघळल्याची शक्यता

अहिल्यानगर : जामखेड शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहोळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर बुधवारी (ता. ५) रात्री गावठी कट्ट्यातून अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यात मोहोळकर गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान ही घटना घडली. हल्लेखोरांनी मोहोळकर याच्यावर पाच ते सहा राउंड फायर केले, त्यापैकी चार गोळ्या त्याच्या डोक्यात आणि शरीराच्या इतर भागात लागल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम जामखेडमधील खासगी रुग्णालयात, नंतर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात आणि शेवटी पुण्यात हलविण्यात आले.

महिनाभरापूर्वीच जामिनावर सुटला होता

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळकर याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो काही काळ नाशिक कारागृहात होता आणि महिनाभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्या सुटकेनंतर जामखेड शहरात तणावाचे वातावरण असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या गोळीबारामुळे गुन्हेगारी वर्तुळातील वाद पुन्हा चिघळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा शोध सुरू

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जिल्ह्यातील गोळीबाराची तिसरी घटना आहे. यापूर्वी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. या तिन्ही घटनांमध्ये गावठी कट्ट्याचा वापर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गावठी कट्टे कुठून येतात, त्याची विक्री करणारे कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाभरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे घार्गे यांनी सांगितले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...