⚡ ब्रेकिंग News

दहावी-बारावी कॉपीमुक्त परीक्षा; सांगली जिल्हा परिषद सज्ज, भरारी पथक तैनात

सांगली : इयत्ता १२वी ची परीक्षा १० फेब्रुवारीपासून आणि १०वी ची २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पारदर्शक, शिस्तबद्ध व कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर कडक देखरेख ठेवली जाईल.

भरारी पथक व तांत्रिक यंत्रणा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांच्या सूचनेनुसार, गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक तैनात केली आहेत. परीक्षा केंद्रांवर मनुष्यबळ व तांत्रिक यंत्रणेचा वापर होईल. विद्यार्थ्यांना समुपदेशन देऊन चुकीच्या मार्गापासून दूर ठेवलं जाईल.

पालकांना आवाहन

"प्रामाणिक अभ्यासाने यश मिळते," हा संदेश विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवला जात आहे. पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावं, अशी विनंती आहे. कोणत्याही गैरप्रकाराला थारा नसल्याचं सीईओ नरवाडे यांनी स्पष्ट केलं.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...