⚡ ब्रेकिंग News

"सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा!" तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश; एकनाथ शिंदेंची महत्त्वाची माहिती


 'बळीराजा संकटात; सरकार गंभीर'; मंत्र्यांना बांधावर जाण्याच्या सूचना; 'गावागावात जनता दरबार घ्या'; 'शिवसेनेचे प्रत्येक मंत्री ग्राऊंड झिरोवर उतरले पाहिजेत'; 'शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही'; पिण्याचे पाणी आणि चाऱ्याला प्राधान्य

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते.

कॅबिनेटमध्ये दुष्काळावर चर्चा झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. "शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे यावर चर्चा करण्यात आली," असे ते म्हणाले. दरम्यान, "नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

"मुख्यमंत्री देखील काही भागात स्वतः जातील. मी देखील काही भागात पाहणी दौरा करणार आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पिके पावसाअभावी गेली आहेत, शेतकरी संकटात आहेत. "बळीराजा अन्नदाता आहे, अशात सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क त्यांचा आहे," असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

"त्याला संकटातून बाहेर काढणं आमचं काम आहे. आपण अनेक वेळेस मदत केली आहे, मदतीच्या आकडेवारीत मी जात नाही. दसरा-दिवाळीत संकट आले, अतिवृष्टी आली तेव्हा देखील आपण मदत केली," असे ते म्हणाले.

"सरकार गंभीर आहे, मंत्री महोदयांनी त्याची दखल घेतली आहे. अधिकारी बांधावर जाईल आणि नुकसान झालं आहे ते मोजलं जाईल आणि पंचनामे केले जाईल. केंद्र सरकारने देखील वारंवार मदत केली आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नुकसानीच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गावागावात जनता दरबार घेण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

"शिवसेनेचे प्रत्येक मंत्री ग्राऊंड झिरोवर उतरले पाहिजेत," असे मंत्र्यांना आदेश देण्यात आले आहेत. "उद्यापासूनच कामाला लागा," अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

"मी शिवसेनेच्या मंत्र्यांना आपआपल्या भागात जाण्याच्या सूचना दिल्या आहेत," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

"सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली आहे. येणाऱ्या 1 ते 2 महिन्यात सरकार म्हणून मदत करेलच; मात्र शिवसेना देखील मदतीला धावेल," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

"शिवसेना देखील काही जबाबदारी घेईल," असेही ते म्हणाले.

'शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही'

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.

"पिण्याच्या पाण्याचे संकट आहे, चाऱ्याचा प्रश्न आहे, याचे नियोजन केले जाईल. जनावरांच्या चाऱ्यांना देखील प्राधान्य दिलं जाईल," असेही ते म्हणाले.

| मुद्दा | तपशील |

| बैठक | मंत्रिमंडळ बैठक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत |

| मुख्य निर्णय | तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश |

| शिंदेंचे वक्तव्य | 'सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा' |

| मंत्र्यांना सूचना | बांधावर जा, जनता दरबार घ्या, ग्राऊंड झिरोवर उतरा |

| मदत | १-२ महिन्यात सरकारकडून मदत; शिवसेनाही धावेल |

| प्राधान्य | पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा |

| आश्वासन | 'शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही' |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...