⚡ ब्रेकिंग News

पांढऱ्या सोन्याला झळाळी! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी मिळण्याची शक्यता; उत्पादनापेक्षा 50 लाख गाठींनी अधिक मागणी


   जागतिक स्तरावर 11 कोटी 73 लाख गाठी उत्पादन, तर 12 कोटी 29 लाख गाठींची मागणी; जळगावात हंगामाच्या सुरुवातीलाच 8,500 रुपयांपर्यंत भाव; गेल्या वर्षापेक्षा अडीच हजार रुपयांनी वाढ

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

जळगाव - जळगाव जिल्ह्यात कापूस (Cotton) खरेदी हंगामाला सुरुवात झाली असून, जिनिंग व बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक हळूहळू वाढत आहे. यंदा लागवड क्षेत्रात घट झाली असली, तरी गेल्या वर्षीप्रमाणे पावसाच्या अतिवृष्टीचा मोठा फटका न बसल्याने कापसाचे (Cotton) उत्पादन आणि गुणवत्ता चांगली राहण्याचा अंदाज आहे.

यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाचे उत्पादन सुमारे 11 कोटी 73 लाख गाठी, तर सूतगिरण्यांची मागणी 12 कोटी 29 लाख गाठी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सुमारे 50 लाख गाठींची तूट निर्माण होण्याची शक्यता असून, जुन्या कापूस साठ्याचीही कमतरता आहे. यामुळे कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगली मागणी मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय कापसाला बांगलादेश आणि व्हिएतनामसह इतर देशांमध्ये निर्यातीची संधी निर्माण होऊ शकते.

दरम्यान, जळगावात हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाला 8,500 रुपयांपर्यंत भाव मिळाला असून, गेल्या वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत हा भाव सुमारे अडीच हजार रुपयांनी अधिक आहे.

यंदा कापसाची गुणवत्ता चांगली असून जागतिक मागणी कायम राहिल्यास आणखी दरवाढ होऊ शकते. तर मागणी आणि गुणवत्तेमुळे कापसाचे दर यावर्षी स्थिर राहण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज कापूस बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

| मुद्दा | तपशील |

| जागतिक उत्पादन | 11 कोटी 73 लाख गाठी |

| जागतिक मागणी | 12 कोटी 29 लाख गाठी |

| तूट | सुमारे 50 लाख गाठी |

| जळगावात भाव | 8,500 रुपये/क्विंटल |

| गेल्या वर्षापेक्षा | अडीच हजार रुपयांनी अधिक |

| निर्यात संधी | बांगलादेश, व्हिएतनाम |

| गुणवत्ता | चांगली |

दरम्यान, बीडच्या आष्टीमध्ये पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती आहे. पाऊस नसल्याचा मोठा परिणाम अल्पभूधारक शेतकऱ्यांवर होत असल्याचे दिसून आले आहे.

बेलेकर यांनी आपल्या एका शेतात टोमॅटोची लागवड केली होती. यासाठी त्यांना 40 हजार रुपये खर्च आला. मात्र, यंदा टोमॅटोला भाव नसल्याने लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून पाऊसही नसल्याने हे टोमॅटोचे रोप कसे सांभाळायचे या विवंचनेतून या शेतकऱ्यांनी एक एकर शेतीतील टोमॅटोची रोपे उपटून फेकले आहेत.

याच एक एकर शेतात मागच्या वर्षी टोमॅटो लागवडीतून चार लाखांचे उत्पन्न झाल्याचेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. मात्र यंदा परिस्थिती बिकट असल्याने "मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे," अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...