क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई, - मुंबई उच्च न्यायालयाने धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने काल सुमोटो दाखल करून घेत सरकारला आज बाजू मांडण्यास सांगितले होते.
न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ध्वनीप्रदूषण प्रकरणावर दोनवेळा सुनावणी घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे.
मुंबई हायकोर्टात राज्य सरकारने बाजू मांडताना सांगितले की, परवानगी फक्त मिरवणुकीला देण्यात आली असून ध्वनिक्षेपकांना कोणतीही परवानगी नाही.
ध्वनिक्षेपकांचा वापर करताना मर्यादेच्या अधीन राहणे बंधनकारक असल्याचे राज्य सरकारने कोर्टात बाजू मांडताना म्हटले.
तसेच लेसर लाईटच्या वापराला तसेच मिरवणुकीत फटाके फोडायला कोणतीही परवानगी नाही, असे राज्य सरकारकडून उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट करण्यात आले.
राज्य सरकारच्या शांतता क्षेत्रांच्या यादीत रुग्णालये आणि शाळांसह धार्मिक स्थळे देखील शांतता क्षेत्रात मोडतात. मग गणपती मंडप देखील शांतता क्षेत्रात मोडू शकतात, मात्र त्यासाठी ते सूचीबद्ध करावे लागेल, अशी भूमिका राज्य सरकारने कोर्टात मांडली.
१. फटाक्यांवर बंदी
धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी उच्च न्यायालयाने घातली आहे.
२. कठोर कारवाई आणि जप्ती
ध्वनी प्रदूषणाची मर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे तसेच उपकरणांची जप्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
३. सिलेंडरवर बंदी
ढोल-ताशा पथकांमध्ये हातोड्याने बडवण्यात येणाऱ्या सिलेंडरवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
४. परवानगी जाहीर प्रदर्शित करा
मंडळांना त्यांना दिलेली परवानगी जाहीर प्रदर्शित करावी लागेल. परवानगी प्रदर्शित न केल्यास ध्वनिक्षेपक लावता येणार नाही, असे उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
५. अनामत रक्कम
तसेच भविष्यात परवानगी देताना अनामत रक्कम घेण्याच्या सूचना उल्लंघन समोर आल्यास अनामत रक्कम जप्त करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.
ध्वनी प्रदूषण तसेच पर्यावरणासंदर्भात नियमावली स्पष्ट आहे. तरी ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी येतात, मग हे थांबवणार कसे? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.
मुंबईत 91 पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्याची भरारी पथक कारवाई करतात, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली. तसेच कायद्यानुसार उपकरण जप्त करण्याची देखील तरतूद असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली.
सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाकडून पंढरपूरच्या वारीचा उल्लेख करण्यात आला. "वारी हजारो लोक करतात, त्यात टाळ वाजवला जातो आणि तिथे ध्वनी प्रदूषण होत नाही," असे कोर्टाने म्हटले.
| मुद्दा | तपशील |
| फटाक्यांवर बंदी | सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी |
| ध्वनिक्षेपक | परवानगी नाही; मर्यादेत राहणे बंधनकारक |
| लेसर लाईट | वापरास परवानगी नाही |
| सिलेंडर | ढोल-ताशा पथकांतील सिलेंडरवर बंदी |
| परवानगी | जाहीर प्रदर्शित करणे बंधनकारक |
| अनामत रक्कम | परवानगी देताना घ्या; उल्लंघन झाल्यास जप्त करा |
| कारवा | कठोर कारवाई आणि उपकरणे जप्त |
| पोलीस ठाणी | मुंबईत 91; भरारी पथके कारवाई करतात |
| पंढरपूर वारी | टाळ वाजवला जातो, ध्वनी प्रदूषण होत नाही |

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.