क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई / बुलढाणा - बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काँग्रेस नेते राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांनी अगोदर फेसबुक लाईव्ह करत भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची घोषणा केली होती. मात्र, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काल राहुल बोंद्रे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधल्यानंतर राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच थांबणार असल्याचे जाहीर केले आहे.
चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. "भाजपने राहुल बोंद्रे यांना कधीही अधिकृतपणे त्यांचा पक्षप्रवेश असल्याचे सांगितले नव्हते. राहुल बोंद्रे यांना चर्चेत राहायचे आहे. ते मानसिकदृष्ट्या खचलेले असल्याने त्यांना पक्षात न घेतलेले बरे," असे श्वेता महाले म्हणाल्या.
भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी राहुल बोंद्रे यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "२०१९ पासून त्यांच्या भाजपमध्ये येण्याच्या चर्चा सुरू आहेत. चर्चा घडवून आणणारे देखील तेच आहेत. भाजपने अधिकृतपणे कधीही त्यांचा पक्षप्रवेश असल्याचे घोषित केले नव्हते."
"राहुल गांधींचा फोन आल्यानंतर चर्चा सुरू झाली. त्यांना केवळ चर्चेत राहायचे आहे. २०१९ पासून त्यांचे भाजपमध्ये येण्याचे प्रयत्न सुरू होते," असे महाले म्हणाल्या.
"राहुल बोंद्रे एकनाथ शिंदे तसेच अजित दादांच्या पक्षात देखील जाण्याच्या प्रयत्नात होते," असेही त्या म्हणाल्या.
"ते दोन वेळा पडले आहेत. त्यांना घेऊन कोणता चमत्कार होणार होता?" असा सवाल श्वेता महाले यांनी केला.
"राहुल बोंद्रे यांनी सांगावे की त्यांना कधी ईडीची नोटीस आली? त्यांच्यावरती अनेक आरोप झालेले आहेत. कोणत्या एका पक्षाचा म्हणून कारवाई थांबत असे नाही," असे महाले म्हणाल्या.
"पक्षप्रवेश या संदर्भात त्यांनी संदेश पाठवले होते. त्यात ते राजकीय संन्यास तसेच कधी राजकीय हस्तक्षेप न करण्याचा दावा करत होते. कॉलेजसाठी प्रवेश करत असल्याचाही राहुल बोंद्रे यांचे म्हणणे होते. मात्र हे सगळे चर्चेपर्यंत मर्यादित होते. आम्ही कधी त्यांना तारीख दिली नव्हती," असे महाले म्हणाल्या.
"ते मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत, त्यांना पक्षात न घेतलेलेच बरे," असे श्वेता महाले यांनी म्हटले.
राहुल बोंद्रे यांनी २० सप्टेंबरला फेसबुक लाईव्ह करत काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. राहुल बोंद्रे यांनी २२ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असे म्हटले होते.
मात्र, काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी करत राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांची फोनवरून चर्चा घडवून आणली. या चर्चेदरम्यान राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच थांबणार असल्याचा शब्द राहुल गांधी यांना दिला.
| मुद्दा | तपशील |
| आधीची घोषणा | राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार (२० सप्टेंबर) |
| निर्णय फिरवला | राहुल गांधींच्या फोननंतर काँग्रेसमध्येच थांबणार |
| मध्यस्थी | हर्षवर्धन सपकाळ |
| श्वेता महाले यांचे म्हणणे | 'भाजपने कधी अधिकृतपणे पक्षप्रवेश घोषित केला नव्हता' |
| ईडी नोटीस | 'कधी आली हे सांगावे' |
| शेवटचे वक्तव्य | 'ते मानसिकदृष्ट्या खचलेले, पक्षात न घेतलेले बरे' |

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.