⚡ ब्रेकिंग News

राहुल गांधींच्या फोननंतर राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला! हर्षवर्धन सपकाळांची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट भाजपवर हल्लाबोल

 'बोंद्रेंवर केसेस टाकण्यात आल्या होत्या, अडचणीत टाकण्यात आलं, हतबल होऊन त्यांनी निर्णय घेतला'; 'भाजपच्या स्थानिक आमदारांनी अनेक चौकशी लावल्या होत्या'; 'वन नेशन वन इलेक्शन नंतर भाजपला वन नेशन वन लीडर करायचा आहे'; दुष्काळावर - 'पाहणीची गरज नाही, तातडीने दुष्काळ जाहीर करा'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई / बुलढाणा - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी फोनवरून संवाद साधल्यानंतर बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काँग्रेस नेते राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांच्या भाजपमधील प्रवेशाला ब्रेक लागला आहे. काँग्रेसमध्ये राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राहुल बोंद्रेंवर केसेस टाकण्यात आल्या होत्या. त्यांना अडचणीत टाकण्यात आले होते. हतबल होऊन त्यांनी हा निर्णय घेतला होता," असे सपकाळ म्हणाले.

राहुल बोंद्रेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता. अगदी आजच नाही तर मागील काही दिवसांपासून त्यांच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्या बैठका सुद्धा भाजपसोबत झाल्या होत्या.

"त्यांच्यावर केसेस टाकण्यात आल्या होत्या. त्यांना अडचणीत टाकण्यात आले होते. हतबल होऊन त्यांनी हा निर्णय घेतला होता," असे सपकाळ म्हणाले.

"त्यांच्या ठिकाणच्या भाजपच्या स्थानिक आमदारांनी अनेक चौकशी लावल्या होत्या," असेही ते म्हणाले.

"राहुल गांधी आपल्या पक्षाला कुटुंबासारखं मानतात. भारत जोडो यात्रेमध्ये आपण राहुल गांधी यांना बघितले असेल," असे सपकाळ म्हणाले.

या आधी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले लोक त्यांनी पक्षाची बांधिलकी जपली नाही. "पक्षासोबत संवाद तोडून ते गेल्याचे," सपकाळ म्हणाले.

"या आधी काँग्रेस सोडून गेलेले लोक रडून गेले, घाबरून गेले होते. तर काहीजण संवाद तोडून गेले. वन नेशन वन इलेक्शन नंतर भाजपला वन नेशन वन लीडर करायचा आहे," असे सपकाळ म्हणाले.

"बोंद्रे यांच्याशी माझं जाण्याआधी बोलणं झालं होतं. जाऊ नये या अनुषंगाने माझं बोलणं झालं होतं," असे सपकाळ म्हणाले.

दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सपकाळ म्हणाले की, "दौरा करणे त्यांचा अधिकार आहे. मात्र तिथे जाऊन काही बघावं आणि आकलन करावं असं काही राहिले नाही."

"दुष्काळ पडलेला आहे, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही काय बघणार? त्यामुळे सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे," असे सपकाळ म्हणाले.

"पाहणीची आवश्यकता नाही, शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. एक लाख हेक्टरी अनुदान सरकारने देण्याची मागणी," त्यांनी केली.

"विशेष अधिवेशन बोलवलं तर सगळ्या मागण्यांवर विशेष चर्चा होईल. आणीबाणीचे संकट आहे. राज्य म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं, शेतकऱ्यांना दिलासा दिला तर ते योग्य होईल," असेही ते म्हणाले.

| मुद्दा | तपशील |

| बोंद्रेंचा निर्णय | भाजप प्रवेश थांबला, काँग्रेसमध्येच राहणार |

| कारण | राहुल गांधींचा फोन |

| सपकाळांचे म्हणणे | 'केसेस टाकून अडचणीत टाकले, हतबल होऊन निर्णय' |

| भाजपवर हल्ला | 'स्थानिक आमदारांनी चौकशी लावल्या' |

| दुष्काळ | 'तातडीने दुष्काळ जाहीर करा, पाहणीची गरज नाही' |

| मागणी | एक लाख हेक्टरी अनुदान, विशेष अधिवेशन |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...