⚡ ब्रेकिंग News

"केंद्र सरकार टप्प्यात आलंय! दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार" - राजू शेट्टींचा इशारा


  'मागण्या मान्य करा, अन्यथा धुराडी पेटणार नाहीत आणि साखरही बाजारात येणार नाही'; २९ सप्टेंबरला प्रल्हाद जोशींच्या हुबळी येथील घरासमोर आंदोलन; 'प्रति टन ५०० रुपये खात्यावर जमा करा, MSP ५००० करा, इथेनॉल दर ७० करा'; 'मागण्या मान्य न झाल्यास अन्नपुरवठा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

सोलापूर - केंद्र सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे यंदा साखरेचा साठा संपत आल्याने केंद्र सरकार पहिल्यांदाच टप्प्यात सापडले आहे. "तुम्हाला जर दिवाळीला साखर हवी असेल तर आमच्या तीन मागण्या मान्य करा, अन्यथा साखर कारखाने सुरूच होणार नाहीत," असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

सध्या साखरेचा देशातील शिल्लक साठा संपत आला असून नवीन साखर कारखाने सुरू झाल्याशिवाय साखर बाजारात येणार नाही. केंद्र सरकारसमोर दसरा आणि दिवाळी असे दोन मोठे सण असून त्यामुळेच कारखाने लवकर सुरू करावेत यासाठी केंद्र सरकार घायकुतीला आले आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त साखर ही महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतून तयार होत असते. यातही महाराष्ट्रातील सहा आणि कर्नाटकातील तीन अशा एकूण नऊ जिल्ह्यांतून बहुतांश साखर तयार होत असते.

त्यामुळे आता महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील घरासमोर आंदोलन होणार आहे.

"आमच्या तीन मागण्या मान्य करा, अन्यथा धुराडी पेटणार नाहीत आणि साखरही बाजारात येणार नाही," असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

१. प्रति टन ५०० रुपये खात्यावर जमा करा

कारखाने ऑक्टोबरला सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी १८ हजार रुपये नुकसान होत असून यासाठी प्रति टन ५०० रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर केंद्र आणि राज्य सरकारने सोडावेत.

२. साखरेचा MSP ५००० करा

गेल्या आठ वर्षांपासून ३१०० एवढी साखरेची एमएसपी (किमान हमीभाव) असून ती आता ५००० करावी.

३. इथेनॉलचा दर ७० रुपये करा

आखाती युद्धाचा फायदा घेऊन पेट्रोलच्या दरामध्ये १२ ते १३ रुपये प्रति लिटर एवढी वाढ करण्यात आली. मात्र, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळत असताना हे सर्व पैसे केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्या खिशात घालत आहे. यामधील इथेनॉलचा हिस्सा शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे असून सध्याचा ५८ रुपये इथेनॉलचा दर वाढवून तो सत्तर रुपये करावा.

या तीन मागण्या मान्य न झाल्यास याला जबाबदार असणाऱ्या अन्नपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलनात केली जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

| मुद्दा | तपशील |

| इशारा | 'दिवाळीला साखर हवी असेल तर तीन मागण्या मान्य करा' |

| आंदोलन | २९ सप्टेंबर, हुबळी, प्रल्हाद जोशींच्या घरासमोर |

| मागणी १ | प्रति टन ५०० रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर |

| मागणी २ | साखरेचा MSP ३१०० वरून ५००० करा |

| मागणी ३ | इथेनॉलचा दर ५८ वरून ७० रुपये करा |

| धोरण | महाराष्ट्र-कर्नाटकातील ९ जिल्ह्यांतून ५०% साखर |

| अंतिम इशारा | मागण्या मान्य न झाल्यास अन्नपुरवठा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...