क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
बीड - बीडमध्ये एक अतिशय संतापजनक आणि खळबळजनक घटना उजेडात आली आहे. बीडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करत तिचे व्हिडिओ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्हिडिओचा वापर करत आरोपीने तिला ब्लॅकमे (Blackmail) करून वारंवार तिच्यावर अत्याचार केले.
याप्रकरणी शेख मुस्सवीर शेख वसीम याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, NEET च्या क्लासला असताना तरुणी आरोपीच्या संपर्कात आली. पुढे BHMS ला ॲडमिशन घेतल्यानंतरही आरोपी तरुणीचा पाठलाग करून शारीरिक संबंधांसाठी सतत दबाव टाकत होता.
तरुणीने सातत्याने नकार दिल्याने, आई-वडील घरी नसताना आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. त्याने पाण्यात गुंगीचे औषध मिसळून तिला पाजले आणि ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने तिचे व्हिडिओही काढले.
यानंतर आरोपीने याच व्हिडिओची धमकी देत तरुणीला हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत त्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला.
४ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीने पुन्हा तरुणीला चित्रपट पाहण्यासाठी येण्याची धमकी दिली. नाहीतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून नातेवाईकांना पाठवेल, अशी धमकी दिली.
या त्रासाला कंटाळून तरुणीने आई-वडिलांना संपूर्ण आपबीती सांगितली. कुटुंबीयांनी धीर दिल्यानंतर तिने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, बॉलिवूडच्या 'स्पेशल 26' चित्रपटाच्या धर्तीवर एका टोळीने बनावट आयकर व क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे भासवून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार अंधेरी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
आरोपींनी बनावट सरकारी ओळखपत्रे दाखवत आयकर व क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर एका व्यापाऱ्याला व त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन कार्यालयातील दहा कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून घेतले. कायदेशीर कारवाईची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.
तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी तपास करत सहा जणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
बीडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार: गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल.
आरोपी: शेख मुस्सवीर शेख वसीम.
गुन्हा: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात.
अंधेरीत खंडणी प्रकरण: बनावट आयकर अधिकाऱ्यांनी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली; सहा जणांना अटक.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.