⚡ ब्रेकिंग News

नागपूर-अमरावती रोडवर भीषण अपघात! ट्रकची दुचाकीला धडक, कामगाराचा जागीच मृत्यू; गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर तरुणाची हत्या


 गोंडखैरी टोल प्लाझाजवळ रात्री ९.३० वाजता घटना; बदिराजा फाउंडेशनच्या टीमने केली मदत; वाहतूक कोंडी सुरळीत; दुसरीकडे जरीपटका येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकू मारून हत्या

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

नागपूर - नागपूर-अमरावती (Nagpur-Amravati) रोडवरील गोंडखैरी टोल प्लाझाजवळ एक भीषण अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. यात एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात संजय कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बदिराजा फाउंडेशनच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टीमने परिस्थितीचा आढावा घेत पोलिसांना माहिती देऊन त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. तसेच अपघातामुळे महामार्गावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी टीमने तत्काळ मदत केली.

घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेप्रकरणी संबंधित पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असून, अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.

तर दुसरीकडे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस हाय अलर्ट असतांना जरीपटका येथील जिंजर मॉलजवळ एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकू मारून हत्या करण्यात आली आहे.

आबिद शेख असे मृतकाचे नाव असून १४ ते १५ मुलांच्या टोळक्यांनी अबिदवर हल्ला केल्याची माहिती आहे. घटनेनंतर आबिदला नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून नेमकं कुठल्या कारणांनी हा हल्ला करण्यात आला याचा देखील पोलीस तपास करत आहे. मात्र या घटनेने नागपूर शहरात मात्र खळबळ उडाली आहे.

कल्याण रोडवरील टोयोटा शोरूम शेजारील सत्यम फोर्ड वर्कशॉपमध्ये रात्री ७:४५ वाजता आगीची भीषण दुर्घटना घडली. या आगीत वर्कशॉपमध्ये पार्क केलेल्या ५ चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून २ गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.

घटनास्थळी शीळ अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी सरनोबत, २ फायर वाहने, १ रेस्क्यू वाहन तसेच डायघर पोलीस व टोरंट पॉवरचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर रात्री ९.०२ वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.

| घटना | तपशील |

| नागपूर-अमरावती अपघात | गोंडखैरी टोल प्लाझाजवळ; ट्रक-दुचाकी धडक; कामगाराचा मृत्यू |

| वेळ | गुरुवारी रात्री ९.३० |

| मदत | बदिराजा फाउंडेशनची टीम; वाहतूक सुरळीत |

| जरीपटका हत्या | १६ वर्षीय आबिद शेखची चाकू मारून हत्या |

| आरोपी | १४-१५ मुलांचे टोळके; शोध सुरू |

| कल्याण आग | सत्यम फोर्ड वर्कशॉप; ५ वाहने जळाली, २ खाक |

| अग्निशमन | रात्री ९.०२ वाजता आग विझली |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...