क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
लातूर - दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या मराठवाड्यातील लातूर, धाराशिवसह सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी निलंग्यातील जाऊ या गावातील शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाअभावी करपलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. उभी पिकं अक्षरशः करपली असून यावेळी दुष्काळाची दाहकता शासनापुढे बळीराजाने मांडली आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मुख्यमंत्र्याशी बोलताना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे "कठीण काळात आमच्या पाठीशी उभं राहण्याची आणि भरीव मदत करण्याची" विनंती केली आहे.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे बांधावर पोहोचले आहेत. शेतकरी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यापुढे मांडत आहे. "ज्या विहिरीला वर्षभर पाणी पुरत होतं, ती विहीर आज कोरडी ठाक पडली आहे. त्यामुळे पुढचं जगणं कसं जगावं, जनावरं कशी जागवावी, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे." परिणामी सरकारने या कठीण काळात मदत पुरवावी अशी विनंती केली आहे.
दुष्काळाची परिस्थिती सरकारने अतिशय गांभीर्याने घेतली आहे.
"येत्या तीन दिवसांत आपली पहिली अधिसूचना निघणार आहे. त्या संदर्भातील सर्व रेकॉर्ड्स आपण गोळा केले आहेत. त्यानुसार आपण कारवाई करतो आहे. शिवाय उपाययोजनांची सुरुवात देखील आपण केली आहे. निश्चितच या गंभीर काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील," असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
"मदत तर आम्ही करणार आहोतच, पण कर्ज माफी देखील चालली आहे. त्याच्या करता जो काही अतिरिक्त निधी लागतोय, त्याचेही साधन आम्ही गोळा करतोय. त्यामुळे निधीची कमतरता पडू देणार नाही. पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल या किंवा निधीची गरज असेल या सर्वांचे आम्ही नियोजन केलं आहे," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
| मुद्दा | तपशील |
| दौरा | लातूर, धाराशिव, सोलापूर |
| पाहणी | निलंग्यातील जाऊ गाव |
| पिक | सोयाबीन करपलेले |
| शेतकऱ्यांची अवस्था | अश्रू अनावर, मदतीची याचना |
| आश्वासन | ३ दिवसांत पहिली अधिसूचना |
| निधी | कमतरता पडू देणार नाही |
| नियोजन | पिण्याचे पाणी, चारा, कर्जमाफी |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.