जळगावातील मुक्ताईनगरात भीषण अपघात; हरताळा गावाजवळ राँग साइडने येताच कारने चौघांना धडक, गंभीर जखमींवर उपचार सुरू
जळगाव: जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एक भीषण अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई-नागपूर महामार्गावर हरताळा गावाजवळील फाट्याजवळ भरधाव एर्टिगा कारने चौघांना जोरदार धडक दिली. या अपघातात चारही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर महामार्गावरून एक एर्टिगा कार राँग साइडने येत होती. यावेळी रस्त्यावर असलेल्या चौघांना या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की चौघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.
दोन नंबरप्लेट आणि फरार चालक
या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघात करणाऱ्या कारवर दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्यामुळे या घटनेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अपघातानंतर कारमधील चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.