⚡ ब्रेकिंग News

नाशिकच्या 'कॅप्टन' मांत्रिकाला अटक; पोलिसांना सापडले ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ, नामांकित महिला सेलिब्रिटी, अधिकाऱ्यांचा समावेश

 

 नाशिकच्या 'कॅप्टन' मांत्रिकाला अटक; पोलिसांना सापडले ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ, नामांकित महिला सेलिब्रिटी, अधिकाऱ्यांचा समावेश

 बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या 'स्वघोषित कॅप्टन' अशोक खरातकडून पोलिसांनी ५८ व्हिडिओ जप्त केले आहेत. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी, वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी 'स्वघोषित कॅप्टन' अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्राँचने अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला सेलिब्रिटी, वरिष्ठ अधिकारी तसेच राजकीय नेत्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नाशिकसह राज्यात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने अशोक खरात याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला गुंगीचे औषध देऊन व धमकी देऊन बलात्कार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राइम ब्राँच युनिट १ ने बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास खरात याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान पोलिसांनी खरात याच्याकडून काही पेन ड्राइव्ह जप्त केल्या असून, त्यात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत. या व्हिडिओंची पोलिस सध्या सखोल तपासणी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला सेलिब्रिटी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, तसेच राजकीय नेते असल्याचे समोर येत आहे. या व्हिडिओंची सत्यता पडताळल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येऊ शकतात, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कोण आहे 'स्वघोषित कॅप्टन' अशोक खरात?

अशोक खरात हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील रहिवासी आहे. तो मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाला असून, त्याने २२ वर्षांच्या कारकिर्दीत १५४ देशांचा दौरा केल्याचे सांगितले जाते. सध्या तो मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ व 'कॉस्मॉलॉजी'चा अभ्यासक असल्याचे भासवत अनेक बडे राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिराला भेट दिल्यानंतर तो चर्चेत आला होता. आता त्याच्यावरील आरोपांमुळे आणि जप्त केलेल्या व्हिडिओंमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात खरातची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...