पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत शिंदेंनी नाराजी व्यक्त केली; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या कामगिरीचं विश्लेषण सुरू असल्याचा इशारा*
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिंदेंनी पक्षाच्या काही खासदारांच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदाच्या अपेक्षा बाळगणाऱ्या खासदारांना शिंदेंनी स्पष्ट इशारा दिला.
सोमवारी रात्री दिल्लीत झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे म्हणाले, "आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा. तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे. तुमच्या सगळ्यांच्या कामाचं विश्लेषण केलं जात आहे. पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात जोरदारपणे मांडा. पक्षाचं प्रतिनिधित्व दिसण्यासाठी पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहून मुद्दे मांडा. काम करणाऱ्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो आणि हे सर्वांना लागू होणार आहे."
येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. या फेरबदलात आपल्याला स्थान मिळावे यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांची धडपड सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी ही खरडपट्टी काढल्याचे समजते. शिंदे यांनी खासदारांना सुनावले की, पक्षासाठी काम करा, मगच पदांच्या अपेक्षा बाळगा.
राहुल शेवाळे यांच्यासाठी विशेष प्रयत्न
दरम्यान, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षात दुसऱ्या स्थानावर असलेल्या शेवाळे यांच्याकडे नवीन जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता आहे. शेवाळे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी रात्री उदय सामंत हे राहुल शेवाळे यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत पोहोचल्यानंतर शेवाळे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत शेवाळे यांची नाराजी दूर झाली का, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.