लग्नानंतर चार वर्षांत दुसऱ्या घराची खरेदी; पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा करत चाहत्यांना दिली गुड न्यूज
'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम', 'झिम्मा', 'क्लासमेट' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आता वैयक्तिक आयुष्यातील आनंदाच्या बातमीने चर्चेत आहे. अभिनेता सिद्धार्थ आणि त्याची पत्नी मिताली यांनी गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर मुंबईत हक्काचे दुसरे घर खरेदी करत गृहप्रवेश केला आहे.
सोशल मीडियावर हा आनंदाचा क्षण शेअर करताना सिद्धार्थने 'नवीन वर्ष, नवं घर, नवी सुरुवात! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा' असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमध्ये दोघेही पारंपरिक पोशाखात नव्या घरात गुढीची पूजा करताना दिसत आहेत. मिताली पारंपरिक साडीत तर सिद्धार्थ मराठमोळ्या लुकमध्ये आपल्या नव्या घराचा आनंद साजरा करताना दिसतोय.
२०२१ मध्ये सिद्धार्थ आणि मिताली यांनी विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांनी मुंबईत पहिले स्वतःचे घर खरेदी केले होते. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुसरे घर घेत त्यांनी आपला आनंद द्विगुणित केला आहे.
सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सिद्धार्थ अलीकडेच माधुरी दीक्षितसोबत 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमध्ये झळकला. तसेच हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' आणि 'माया' या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंदीस उतरल्या.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.