'दुसरी बाजू ऐकून न घेता निलंबनाचे आदेश चुकीचे', 'पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या नेत्यांना सूट का?'; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्याप्रकरणी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर आता ज्येष्ठ वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'सभापती हे न्यायाधीशांप्रमाणे असतात, त्यांनी कार्यकर्त्यांप्रमाणे निर्णय घोषित करणे अनाकालनीय आहे,' असे म्हणत त्यांनी या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.
'दुसरी बाजू ऐकून न घेता निलंबन चुकीचे'
ऍड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, उपसभापतींनी दिलेला निलंबनाचा आदेश नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांविरुद्ध जाऊन आहे. ते म्हणाले, "दुसरी बाजू, म्हणजेच ऑल इंडिया सर्विस ऑफिसरची बाजू ऐकून न घेता थेट निलंबन करणे हे अत्यंत चुकीचे आहे. निलंबन आदेश काढण्यापूर्वी सभापतींना तसा थेट अधिकार आहे का, याचा अभ्यास होणे आवश्यक होते."
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या नेत्यांना सूट?'
सदावर्ते यांनी पुढे प्रश्न उपस्थित करत म्हटले की, "पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या नेतेमंडळीला सूट आहे का? मंत्री जयकुमार गोरे यांनी वस्तुस्थिती सांगितली आहे. त्याप्रमाणे पोलिसांची चूक दिसत नसल्यास, दोन्ही बाजूंना न ऐकता घाईगडबडीने निलंबनाचा आग्रह का धरण्यात आला?"
त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "आक्रमकता आणि परिस्थिती आवाक्याबाहेर घालून राजकारण करणे, त्यात ऑल इंडिया सर्विस ऑफिसर आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राजकीय बळीचा बकरा करणे, हे राजकारण चुकीचे आहे."
राजकारण्यांचं पोलीस खेळणे बनल्यासारखं'
सदावर्ते यांनी चेतावणी देत म्हटले की, "पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन एकतर्फी बाजू ऐकून केले जाऊ नये. तसे केले तर राजकारण्यांचं पोलीस खेळणे बनल्यासारखं होईल."
त्यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडेही नाराजी व्यक्त करत म्हटले की, "सभापती महोदय म्हणत आहेत की मी निर्णय दिलाय, आता त्यावर बदल करण्यावर चर्चा नको. हे न्यायसंयुक्तिक किंवा संविधानिक वाटत नाही."
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
या प्रकरणी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय लोकसेवा आयोग, डीओपीटी तसेच पार्लमेंट सेक्रेटरी यांना निवेदन देणार असल्याची माहिती आहे. या विषयावर ते दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
साताऱ्यात नेमकं काय झालं?
एकूण जागा: ६५, बहुमतासाठी ३३ जागा आवश्यक
शिवसेना-राष्ट्रवादी युतीकडे ३५ जागा (बहुमत)
भाजपकडे २७ जागा (सर्वात मोठा पक्ष)
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय झाले?
भाजपने शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ३ आणि १ अपक्ष असे एकूण ६ सदस्य फोडले
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेचा आरोप
प्रमुख मुद्दे
ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची टीका: उपसभापतींचा निलंबन आदेश नैसर्गिक न्यायाविरुद्ध
प्रश्न: 'पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या नेत्यांना सूट का?'
चेतावणी: 'राजकारण्यांचं पोलीस खेळणे बनल्यासारखं होईल'
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.