⚡ ब्रेकिंग News

'वसुलीसाठी जबरदस्ती करू नका, चालकांशी सौजन्याने वागा'; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे कडक निर्देश


  'वसुलीसाठी जबरदस्ती करू नका, चालकांशी सौजन्याने वागा'; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे कडक निर्देश

 परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नाराजीनंतर परिपत्रक; ई-चलान वसुलीत अनियमितता केल्यास शिस्तभंगाची कारवाईचा इशारा

मुंबई: वाहतूक पोलिसांच्या वर्तनावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी नोंदवल्यानंतर राज्याच्या वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा पोलीस आयुक्त आणि अधीक्षक यांना परिपत्रक काढून वाहतूक पोलिसांच्या वर्तनाबाबत कडक निर्देश दिले आहेत.

काय म्हटले आहे परिपत्रकात?

अप्पर पोलीस महासंचालकांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चालकांकडून प्रलंबित ई-चलान दंड वसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती करू नये. तसेच पैशांची अवैध मागणी करू नये आणि चालकांशी नेहमी सौजन्याने वागावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या सूचनांचे किंवा ई-चलान वसुलीबाबत जारी केलेल्या परिपत्रकाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचेही आदेशात म्हटले आहे.

वाहतूकदारांच्या तक्रारी काय?

राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी ५ मार्च २०२६ रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी वाहतूक पोलिसांच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रारी मांडल्या. त्यात वाहतूक पोलिस चालत्या वाहनांना अनावश्यक थांबवून ई-चलान दंड जबरदस्तीने वसूल करतात, दंड न भरल्यास वाहन अडवणे, कागदपत्रे जप्त करण्याची धमकी देतात, चालकांशी उद्धट वर्तन करतात, तर काही प्रकरणांमध्ये पैशांची अवैध मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्र्यांनी नाराजी नोंदवल्यानंतर हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांनी मेट्रो अक्वा लाईन ३ च्या स्थानकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मेट्रो स्थानकांच्या प्रवेश आणि निर्गमन दरवाज्यांबाहेरील ३० मीटर परिसर २४ तास नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

कफपरेड ते आरे दरम्यानची ३३.५ किमी लांबीची मेट्रो अक्वा लाईन ३ ही मुंबईतील महत्त्वाची मेट्रो लाईन आहे. या मार्गावर एकूण २७ स्थानके आहेत. या स्थानकांच्या प्रवेशद्वार आणि निर्गमनद्वारांवर अनेकदा वाहने उभी राहत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. तसेच यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. ही समस्या लक्षात घेऊन अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक) डॉ. प्रियांका नारनवरे यांनी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करत हा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...