⚡ ब्रेकिंग News

इराणचा युरोपला थेट इशारा? हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या डिएगो गार्सिया तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला


इराणचा युरोपला थेट इशारा? हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या डिएगो गार्सिया तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला

दोन्ही क्षेपणास्त्रे लक्ष्यापासून दूर पडल्याने मोठा अनर्थ टळला; तर ट्रम्प यांनी नाटो देशांना ‘भित्रे’ म्हणत केले टीकेची झोड.

तेहरान/वॉशिंग्टन : इराणने हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर थेट हल्ला करत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आज (२१ मार्च) इराणने हिंद महासागरातील डिएगो गार्सिया या महत्त्वाच्या लष्करी तळावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. मात्र, सुदैवाने ही दोन्ही क्षेपणास्त्रे तळावर आदळली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

हा तळ इराणच्या किनारपट्टीपासून सुमारे ३ हजार ८१० किलोमीटर तर तेहरानपासून ५ हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. डिएगो गार्सियाचा तळ अमेरिकेसाठी अत्यंत धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. येथून अमेरिका आपली बॉम्बर विमाने, मोठी टँकर विमाने (केसी-१३५) तसेच टेहळणी विमाने चालवते.

ट्रम्प यांची नाटोवर टीका :

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाला पाठिंबा न दिल्याबद्दल नाटो मित्र राष्ट्रांवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी नाटो देशांना ‘भित्रे’ म्हणत संबंधित देशांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अमेरिकेशिवाय ही युती केवळ एक कागदी वाघ आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, ती खुली ठेवण्यासाठी लष्करी मदत देणे सोपे आहे, परंतु मित्र राष्ट्रे त्यापासून मागे हटत आहेत. "ही एक अतिशय सोपी लष्करी चाल आहे, ज्यात धोका खूप कमी आहे, पण त्यांना मदत करायची नाही. ते भित्रे आहेत आणि आम्ही हे लक्षात ठेवू," असे ट्रम्प म्हणाले.

युद्धाची स्थिती आणि इराणची भूमिका :

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी केवळ युद्धविराम पुरेसा नसून ते पूर्णपणे संपले पाहिजे. जपानच्या क्योडो न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत अराघची म्हणाले, "हे युद्ध आमचे नाही, ते आमच्यावर लादले गेले आहे. आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करत असताना आमच्यावर हल्ला झाला, जो पूर्णपणे बेकायदेशीर आणि विनाकारण होता." इराण जे काही करत आहे ते आत्मसंरक्षणासाठी असून, आवश्यक असल्यास ते स्वतःचे संरक्षण करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून युद्धाच्या संपूर्ण आणि कायमस्वरूपी समाप्तीची हमी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

इस्रायली जनरलचा ईमेल हॅक केल्याचा दावा :

दुसरीकडे, इराणशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या ‘हंदला’ या हॅकर गटाने इस्रायली लष्कराचे वरिष्ठ अधिकारी एरन ओर्टल यांचा ईमेल हॅक केल्याचा दावा केला आहे. प्रेस टीव्हीनुसार, या हॅकर गटाने सुमारे १ लाख गोपनीय ईमेल मिळवल्याचा दावा केला असून, यामध्ये इस्रायली लष्करी योजनांशी संबंधित माहिती असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिगेडियर जनरल एरन ओर्टल यांनी पूर्वी इस्रायली सैन्यात उच्च पदावर काम केलेले असून ते सध्या एका विद्यापीठात कार्यरत आहेत. मात्र, या हॅकिंगच्या दाव्याला सध्या कोणतीही ठोस पुष्टी मिळालेली नाही.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...