⚡ ब्रेकिंग News

धक्कादायक! समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचा खून; आरोपी घटनास्थळी गर्दीत उभा

धक्कादायक! समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचा खून; आरोपी घटनास्थळी गर्दीत उभा

हत्येनंतर गर्दीत मिसळणाऱ्या आरोपीचा पुणे पोलिसांनी उलगडला गूढ खून प्रकरणातील सहभाग.

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील दोन अल्पवयीन मुलांच्या हत्येचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला आहे. समलैंगिक संबंधांना विरोध केल्यामुळे आरोपी अक्षय दत्तात्रय मांजरे (वय २२) याने १२ वर्षे आणि ११ वर्षांच्या दोन मुलांचा क्रूरपणे खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. या दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळी गर्दीचा भाग बनून उभा होता, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

१७ मार्च २०२६ रोजी दहिवडी गावातील १२ वर्षांचा मुलगा सकाळी १०.३० ते ११.०० च्या सुमारास घराबाहेर पडला. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला असता उसाच्या शेतात विहिरीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर डोक्यात गंभीर दुखापत तसेच शरीरावर ओरखड्यांच्या खुणा होत्या. याप्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम १०३ (१) नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला.

या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली. मागील वर्षी २१ जून २०२५ रोजी अशाच पद्धतीने ११ वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती. तेव्हाही समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने आरोपी अक्षय मांजरेने या मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. मात्र, त्या वेळी पोलिसांनी केलेल्या जुजबी चौकशीतून आरोपी सुटला होता, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

त्यानंतर १७ मार्च २०२६ रोजी १२ वर्षांच्या मुलावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करत असताना मुलाने विरोध केल्याने आरोपीने हीच क्रूर कृत्य केल्याचे तपासात उघड झाले. विशेष म्हणजे, या दोन्ही हत्या केल्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आरोपी अक्षय मांजरे घटनास्थळी गर्दीत मिसळून उभा होता. पोलिसांनी गावातील अनेकांची कसून चौकशी केली असता अक्षयच्या सांगण्यात विसंगती आढळून आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या दोन्ही हत्याकांडातील संबंध उघडकीस आणत आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलिसांनी आरोपीकडे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...