'आनंदी' घेऊन येतेय सुखाची नांदी; दृष्टीहीन मुलांसोबत इंद्रधनुष्यात भरले आनंदाचे रंग, स्पर्श, आवाज अन् भावनांचा जिवंत अनुभव
मुंबई : रंग फक्त डोळ्यांनीच दिसतात की मनानेही अनुभवता येतात? हा साधा वाटणारा प्रश्न, पण त्यात दडलेली भावना मात्र खूप गहिरी आहे. आणि याच भावनेला स्पर्श करणारी एक खास, हृदयात घर करणारी भेट घडली स्टार प्रवाहच्या 'आनंदी' परिवारासोबत. जागतिक रंग दिनाच्या निमित्ताने 'आनंदी' परिवाराने मुंबईतील श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टमधील दृष्टीहीन मुलांसोबत इंद्रधनुष्यात आनंदाचे रंग भरले. रंग म्हणजे केवळ दिसणाऱ्या छटा नाहीत, तर त्या स्पर्शात, आवाजात, भावनांमध्ये आणि अनुभवांमध्येही जगता येतात याचा जिवंत अनुभव या उपक्रमातून साकारला.
इंद्रधनुष्य मनाने अनुभवले
संस्थेतील मुलांनी इंद्रधनुष्य फक्त रंगवलं नाही, तर ते मनापासून अनुभवलं. प्रत्येक रंगासोबत एक वेगळी भावना, एक नवा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलताना दिसत होता. त्या निरागस हास्यात, त्या उत्साहात आणि त्या अनोख्या अनुभवात 'रंग' खऱ्या अर्थाने जिवंत झाले. डोळ्यांना दिसणाऱ्या रंगांपेक्षा मनाने जाणवणारे रंग किती समृद्ध असतात, याची जाणीव 'आनंदी' मालिकेच्या कलाकारांसोबत अधिक गडद झाली. हा अनुभव केवळ एक उपक्रम नव्हता तर संवेदनांचा आणि भावनांचा एक सुंदर उत्सव होता जो प्रत्येकासाठीच कायम स्मरणात राहणारा ठरला.
कलाकारांची उपस्थिती
या खास उपक्रमात 'आनंदी' मालिकेतील प्रमुख कलाकार सहभागी झाले होते. मालिकेच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणाऱ्या नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर, युगंधर निंबाळकरची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, तसेच इतर कलाकारांनी दृष्टीहीन मुलांसोबत हा खास क्षण साजरा केला. कलाकारांनी मुलांसोबत रंगांचा खेळ खेळत त्यांना स्पर्शाने, आवाजाने रंग ओळखण्याचा अनुभव दिला.
'आनंदी' मालिकेची विशेषता
स्टार प्रवाह वाहिनीने आजवर मालिका विश्वात सामाजिक, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेले विविध विषय हाताळत प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन केले आहे. याच यशस्वी परंपरेला पुढे नेत, आता वाहिनी एक हृदयस्पर्शी कथा घेऊन सज्ज झाली आहे.
मालिकेच्या शीर्षकाला साजेशीच ही कथा आहे 'आनंदी' ची. एका अपघातात दृष्टी गमावलेली, पण तरीही जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारी एक तरुणी. डोळ्यांनी जग दिसत नसतानाही, ती आपल्या मनाने आणि संवेदनांनी संपूर्ण जग अनुभवते. तिचं अंधत्व हा तिचा दुबळेपणा नसून, तिची सर्वात मोठी ताकद आहे.
कलाकारांची माहिती
आनंदी च्या भूमिकेत – नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर
युगंधर निंबाळकर च्या भूमिकेत – सुप्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी
आत्माराम जाधव (आनंदीचे आजोबा) – दिग्गज अभिनेते अरुण नलावडे
- आनंदीच्या बहिणी – आलापिनी निसाळ आणि पयोष्णी ठाकूर
कधी पाहायची?
ही हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवी मालिका 'आनंदी' ३० मार्चपासून दररोज रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर. डोळ्यांनी नसतानाही मनाने जग अनुभवणाऱ्या या आनंदीची कहाणी नक्की पहा, अनुभवा.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.