⚡ ब्रेकिंग News

'क्वीन' फेम अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


  'क्वीन' फेम अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवनींद्र बहल यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; मुलगा कानू बहलची भावनिक पोस्ट व्हायरल

मुंबई: 'इश्कबाज' मालिका आणि 'क्वीन' सिनेमातील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्गज अभिनेत्री नवनींद्र बहल यांचं वयाच्या ७६व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

नवनींद्र बहल यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते-निर्माते ललित बहल यांचं २०२१ मध्ये कोविडमुळे निधन झालं होतं. त्यानंतर आता नवनींद्र बहल यांच्या जाण्यानं बहल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मुलगा कानू बहलची भावनिक पोस्ट

नवनींद्र बहल यांचे पुत्र आणि सिनेनिर्माते कानू बहल यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आईचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, "माझी ताकद, माझा विश्वास, माझं प्रेम, माझी मार्गदर्शक, माझी गुरु, माझं हृदय... अलविदा आई. जोपर्यंत तू मला पुन्हा जन्म देत नाहीस, तोपर्यंतसाठी..."

पुढे ते म्हणाले, "माझे डोळे त्या उत्स्फूर्त हास्याला, त्या प्रेमळ खळखळाटाला, त्या मायेच्या मिठीला आणि नेहमीच चमकणाऱ्या त्या कुतूहलपूर्ण नजरेला कायमच शोधत राहतील. माझ्या आत्म्याला प्रकाशमान केल्याबद्दल तुझे आभार."

सेलिब्रिटींकडून श्रद्धांजली

कानू बहल यांच्या पोस्टवर अनुराग कश्यप, अंशुमन झा, रसिका दुगल, हर्षवर्धन कपूर यांसह अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

सिनेसृष्टीतील बहारदार कारकीर्द

नवनींद्र बहल यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून रंगमंचावर अभिनयाला सुरुवात केली. अनेक दशकं त्यांनी थिएटर, टेलिव्हिजन आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

गुलजार दिग्दर्शित 'माचिस', दिबाकर बॅनर्जी यांचा 'ओये लकी! लकी ओये!' आणि कंगना रनौतचा बहुचर्चित 'क्वीन' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. 'द प्राइड' आणि 'द गुरू' यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्येही त्या झळकल्या.

दूरचित्रवाणीवर 'इश्कबाज' आणि 'दिल बोले ओबेरॉय'मधील नकुल मेहताच्या आजीच्या भूमिकेसाठी त्या प्रसिद्ध होत्या. 'विजी' आणि 'सदा-ए-वादी' या मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...