⚡ ब्रेकिंग News

युद्धामुळे उडाला महागाईचा भडका! एलपीजी नंतर आता खाद्यतेलाच्याही किमती कोसळल्या; एका लिटरची किंमत किती?


  युद्धामुळे उडाला महागाईचा भडका! एलपीजी नंतर आता खाद्यतेलाच्याही किमती कोसळल्या; एका लिटरची किंमत किती?

इराण-इस्रायल तणावाचा फटका; सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही

मुंबई: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचे  पडसाद आता थेट भारतीयांच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, अवघ्या काही दिवसांतच प्रति लिटर १० ते १५ रुपयांनी दर वधारले आहेत. ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर झालेल्या या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

किती रुपयांनी महागले तेल?

बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून विविध प्रकारच्या तेलांचे दर खालीलप्रमाणे आहेत:

पाम तेल: १२० रुपयांवरून १३५ रुपये प्रतिलिटर

सूर्यफूल तेल: १४० रुपयांवरून १५५ रुपये प्रतिलिटर

शेंगदाणा तेल: १८० रुपयांवरून १९० रुपये प्रतिलिटर

डालडा: १० रुपयांनी वाढ

या शिवाय तेलात तळले जाणारे पदार्थ, फ्रायम्स, नूडल्स, सेव यांच्याही किमतीत प्रतिकिलो ५ रुपयांची वाढ झाली आहे. पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या सुगंधी तेलाच्याही किमती वाढल्याचे किराणा व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारपेठेतील चित्र

मार्केट यार्डमध्ये १५ किलोच्या डब्यामागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. बाहेरील राज्यांतून होणारी आवक घटल्याने घाऊक बाजारात १० ते १२ टक्के दरवाढ दिसून येत आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत १६० रुपयांना मिळणारे एक किलो सूर्यफूल तेल आता १७३ रुपयांच्या पार गेले आहे. सूर्यफूल तेलाच्या तुटवड्यामुळे सोयाबीन तेलाची मागणी अचानक वाढली असून त्याचेही दर वाढले आहेत.

दरवाढीमागील कारणे काय?

१. जागतिक तणाव: इराण-इस्रायल संघर्षामुळे खनिज तेलाच्या  किमती वाढल्या असून वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे.

२. आयातीत अडथळे: बंदरांवरील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने खाद्यतेलाची आयात मंदावली आहे.

३. सणासुदीची मागणी: गुढीपाडवा जवळ आल्याने खाद्यतेलाच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदाचा गुढीपाडवा महागाईमुळे सर्वसामान्यांसाठी चांगलाच महागडा ठरण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...