दीपिका-प्रियांका नव्हे, तर 'ही' अभिनेत्री आहे बॉलिवूडची लेडी परफेक्शनिस्ट; साडी चुरगळू नये म्हणून केले असे काही की...
'पोन्नियन सेल्वन'च्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनच्या परफेक्शनचा किस्सा; ६-७ तास सेटवर उभ्या राहिल्या, पण साडीवर एक अढीही पडू दिली नाही
मुंबई: विश्वसुंदरीचे मुकुट भूषवणारी, बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या सौंदर्याची धूम पाडणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या ऐश्वर्याने आजही आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण ती जेवढी सुंदर आहे, तितकीच तिच्या कामाबद्दलची निष्ठा आणि समर्पणही अतुलनीय आहे. त्यामुळेच तिला बॉलिवूडची 'लेडी परफेक्शनिस्ट' म्हटले जाते.
ऐश्वर्याच्या कामाबद्दलच्या या समर्पणाचा एक धक्कादायक किस्सा नुकताच समोर आला आहे. हैदराबादमधील ज्वेलर प्रतीक्षा प्रशांत यांनी एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला आहे.
साडी चुरगळू नये म्हणून ६-७ तास उभे राहणे
प्रतीक्षा प्रशांत यांनी सांगितले की, मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियन सेल्वन' या महाकाव्यात्मक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्याने आपली परफेक्शनिस्ट वृत्ती दाखवून दिली. "ऐश्वर्या उगाच एवढी मोठी स्टार झालेली नाही. मी स्वतः पाहिले आहे की ती आपला लूक, ड्रेस, स्टाईल आणि कॉस्ट्यूमबाबत किती अलर्ट असते. तिला स्वतःच्या हेअरस्टाईलमध्ये एकही हेअर पिन दिसायला नको असतो. तिला प्रत्येक अँगलने परफेक्ट दिसायचे असते," असे त्या म्हणाल्या.
त्यांनी पुढे एक खास किस्सा सांगितला, "पोन्नियन सेल्वनच्या एका सीनसाठी ऐश्वर्याला ऑर्गेंजा साडी नेसायला दिली होती. शूटिंगदरम्यान ती तब्बल ६-७ तास सेटवर उभी राहिली आणि एकदाही बसली नाही. कारण तिला तिची साडी अजिबात चुरगळू द्यायची नव्हती. तिला त्या साडीवर एक छोटीशी अढीही नको होती. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे."
पोन्नियन सेल्वनमध्ये ऐश्वर्याची दमदार भूमिका
मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियन सेल्वन' हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला होता. यात ऐश्वर्याने नंदिनीची भूमिका साकारली होती. 'पोन्नियन सेल्वन २' मधील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. या भूमिकेसाठी तिला SIIMA पुरस्कार सोहळ्यात 'बेस्ट एक्ट्रेस इन लीडिंग रोल (क्रिटिक्स)' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता. ऐश्वर्याची ही कारकीर्द आणि तिचे कामाप्रती असलेले समर्पण पाहता, ती खऱ्या अर्थाने बॉलिवूडची 'लेडी परफेक्शनिस्ट' असल्याचे सिद्ध होते.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.