⚡ ब्रेकिंग News

नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित थरार; नाचताना धक्का लागल्याने भडकला गुंड, मित्रांवरच कोयत्याने हल्ला


  नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित थरार; नाचताना धक्का लागल्याने भडकला गुंड, मित्रांवरच कोयत्याने हल्ला

 आडगावमध्ये किरकोळ वादातून तडीपार गुंडाच्या हाताची करंगळी तुटली; चौघा मित्रांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल

नाशिक: आनंद आणि उत्साहाचा सोहळा मानल्या जाणाऱ्या हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ धक्क्यावरून सुरू झालेला वाद रक्तरंजित हल्ल्यात बदलल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. आडगाव शिवारातील विडी कामगारनगर येथे शनिवारी रात्री ही घटना घडली, जिथे मित्रांनीच आपल्याच सहकाऱ्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला.

धक्का लागल्याने सुरू झाला वाद

तन्मय शिरसाठ यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अमोल सोमनाथ जगळे (वय 35) हा देखील उपस्थित होता. रात्री उशिरा गाण्यांच्या तालावर नाचत असताना संशयित सिद्धांत उर्फ भुऱ्या वंजारी याचा अमोलला धक्का लागला. "जरा व्यवस्थित नाच," असे अमोलने सांगितल्याने सिद्धांत संतापला आणि या किरकोळ वादाचा राग त्याने मनात धरला.

मित्रांनाच बोलावून केला हल्ला

राग अनावर झालेल्या सिद्धांतने आपल्या साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. पीयूष खाडे, चिराग गजबे आणि नितीन मरकड हे तेथे पोहोचताच चौघांनी मिळून अमोलला शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. "याला आता सोडायचे नाही," असे म्हणत सिद्धांतने कमरेला खोचलेला धारदार कोयता काढून अमोलवर वार केला.

करंगळी तुटली, गंभीर जखमी

अमोलने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केल्याने वार त्याच्या हातावर बसला. या हल्ल्यात त्याच्या हाताची करंगळी तुटली असून तो गंभीर जखमी झाला आहे.

तडीपार गुंडावरच हल्ला

विशेष म्हणजे, जखमी अमोल जगळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. त्याच्यावर हल्ला करणारे संशयित हे त्याचेच मित्र असल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी केली अटक

या प्रकरणी आडगाव पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करत सर्व चारही संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...