⚡ ब्रेकिंग News

आठ वर्षांनी सिद्धार्थ जाधवचं रंगमंचावर दणक्यात पुनरागमन; 'ॲनिमल' नाटकात साकारणार दुहेरी भूमिका


  आठ वर्षांनी सिद्धार्थ जाधवचं रंगमंचावर दणक्यात पुनरागमन; 'ॲनिमल' नाटकात साकारणार दुहेरी भूमिका

 महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित 'ॲनिमल'मध्ये एकपात्री शैलीत उलगडणार कथा; ठाणे-बोरीवली-दादरसह सहा शहरांत सलग प्रयोग

मुंबई: मराठी रंगभूमीवर अभिनेता सिद्धार्थ जाधवचं आठ वर्षांनी दणदणीत पुनरागमन होत आहे. महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित 'ॲनिमल' या नाटकातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या एकपात्री नाटकात सिद्धार्थ दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, सिद्धार्थने या नाटकाची निर्मितीही केली आहे.

सहा शहरांत सलग प्रयोग

'ॲनिमल'चे प्रयोग केवळ एकाच ठिकाणी न होता ठाणे, बोरीवली, वाशी, दादर, पार्ले आणि मुलुंड अशा सहा नाट्यगृहांमध्ये सलग सादर होणार आहेत. यामुळे रंगभूमीप्रेमींमध्ये या नाटकाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. गडकरी रंगायतन, ठाण्यापासून या प्रयोगांची सुरुवात होणार आहे.

काय आहे 'ॲनिमल'ची कथा?

नाटकाची कथा दत्तू या तरुणाभोवती फिरते. छोट्या गावातून अभिनेता होण्याच्या स्वप्नासह मुंबईत आलेला हा तरुण शहरातील स्पर्धा, अस्थिरता, नात्यांमधील अंतर आणि मानसिक ताण यांच्या घुसमटीत सापडतो. एका व्यक्तीच्या मनात चालणारी ही झुंज एकपात्री शैलीत रंगमंचावर साकारली जाणार आहे.

सिद्धार्थ म्हणाला...

या नाटकाबद्दल बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला, "हे नाटक मला कलाकार म्हणून नव्याने तपासते. प्रत्येक प्रयोगासोबत हा प्रवास अधिक खोल होत जातो. सलग वेगवेगळ्या रंगमंचांवर प्रेक्षकांसमोर उभे राहणे म्हणजे प्रत्येक वेळी नवा अनुभव जगण्यासारखे आहे."

'ताराराम'ची पहिली निर्मिती

सिद्धार्थ जाधवने आई-वडिलांच्या स्मरणार्थ 'ताराराम' या निर्मिती संस्थेची स्थापना केली असून, 'ॲनिमल' ही या संस्थेची पहिली निर्मिती आहे. नाटकाला स्वतः महेश मांजरेकर यांनी संगीत दिले आहे. सिद्धार्थचे रंगमंचावर पुनरागमन, महेश मांजरेकर यांचे लेखन-दिग्दर्शन आणि एकपात्री शैलीमुळे 'ॲनिमल'कडे रसिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...