⚡ ब्रेकिंग News

‘अजित दादांना सर्व ‘कडू सत्य’ माहित होते’; रूपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकर प्रकरणी गंभीर आरोप

‘अजित दादांना सर्व ‘कडू सत्य’ माहित होते’; रूपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकर प्रकरणी गंभीर आरोप

राजीनामा आधीच मागितला पण तटकरेंनी थांबवला; दिवंगत नेत्यांच्या शेवटच्या काळातील ‘घेराव’ उघडकीस आणणार असल्याचा इशारा

पुणे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यापासून ते दिवंगत नेते अजित पवार यांच्या भूमिकेपर्यंत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, हे सर्व ‘कडू सत्य’ अजित दादांना माहित होते. त्यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा आधीच मागितला होता, मात्र सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला असा गंभीर आरोप ठोंबरे यांनी केला.

अजित दादा असते तर छडीने सरळ केले असते

अजित दादा आज आपल्यात नसले, तरी ते असते तर या लोकांना ‘छडीच्या तालावर’ सरळ केले असते, अशी प्रतिक्रिया ठोंबरे यांनी संतापाच्या सुरात दिली. पुढे बोलताना त्यांनी इशारा दिला की, अजित दादांना त्यांच्या शेवटच्या काळात कोणी-कोणी आणि कशा प्रकारे घेरले होते, या सर्व गोष्टी येणाऱ्या काळात नावानिशी जाहीर केल्या जातील. दादांना जिवंत असताना हे करता आले नाही, ते आता ‘वर’ गेल्यावर या भोंदू बाबाच्या माध्यमातून जगासमोर आणले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाला रुपाली चाकणकरच जबाबदार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

राजीनामा देताना सुनेत्रा पवार यांच्यासोबत हसतानाचा फोटो आला, त्यावरून ठोंबरे यांनी टीका करताना म्हटले की, “एक बाई म्हणून तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती.” राजीनाम्यामागील ‘वैयक्तिक कारण’ हे खोटे असून हा बालिशपणा व मुजोरीपणा आहे, असे ठोंबरे यांनी म्हटले. तसेच, तुला हवे असेल तर त्या भोंदू बाबाचे पाय तुझ्या नवऱ्याला लाव, आम्हाला काही देणेघेणे नाही; मात्र महत्त्वाच्या पदावर बसून असा थिल्लरपणा महाराष्ट्र सहन करणार नाही, असा रोखठोक प्रतिसादही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रथम राजीनामा द्या, मग बोला’ अशी भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत, असेही ठोंबरे म्हणाल्या. चाकणकर दर १५ दिवसांनी नाशिकला या भोंदू बाबाकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा विकृत कृत्ये करणाऱ्या महिलेचा गुरु हा भोंदू बाबाच आहे. राजीनामा देताना तपासाची मागणी करणे ही केवळ ‘नौटंकी’ असून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधार त्या स्वतःच आहेत, असे ठोंबरे यांनी आरोप केला.

पुढे बोलताना त्यांनी चाकणकर या भोंदू बाबाला ‘पप्पा’ किंवा ‘डॅडी’ म्हणत असल्याचे सांगितले. एखाद्या बाईने वैयक्तिक आयुष्यात कुठे फिरावे हे तिचे स्वातंत्र्य असले, तरी आमदार किंवा संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वागणे गरजेचे असते, असेही त्यांनी नमूद केले. चाकणकर यांनीच अनेक लोकप्रतिनिधी व नेत्यांना या भोंदू बाबाकडे नेऊन त्यांची ओळख वाढवून दिली. अजित दादांच्या घरातून बाहेर पडलेले ‘उतारे’ आणि त्यांचा झालेला अपघात यामागे ही भोंदूगिरी आणि रक्तातली विकृती कारणीभूत आहे का, असा सवालही ठोंबरे यांनी उपस्थित केला.

शेवटी, सुनेत्रा वहिनींनी अशा बाईसोबत न राहण्याचा आणि राजीनामा घेण्याचा जो निर्णय घेतला, तो योग्यच असल्याचे सांगत कोणत्याही चांगल्या घरातील माणूस आपल्या घरातील महिलांना अशा बाईसोबत कामाला पाठवणार नाही, अशी टीकाही ठोंबरे यांनी केली.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...