⚡ ब्रेकिंग News

वसंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्या सुवर्ण महोत्सवी सोहळा!

 

५० वर्षांची यशस्वी वाटचाल; दिघंची येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

दिघंची (प्रतिनिधी):

येथील वसंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असून, या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा मुख्य सोहळा शुक्रवार, दिनांक २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता कोळेकर महाराज मठ,  दिघंची येथे अत्यंत उत्साहात पार पडणार आहे.

२० मार्च १९७६ रोजी महाराष्ट्राचे लाडके नेते स्व. वसंतदादा पाटील यांच्या शुभहस्ते या संस्थेचा शुभारंभ झाला होता. सुरुवातीला केवळ ३५० सभासद, ५००० रुपये वैयक्तिक भागभांडवल आणि १५,००० रुपयांच्या शासकीय अनुदानातून या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. संस्थेचे संस्थापक चेअरमन दुर्योधन तुकाराम नळ आणि व्हाईस चेअरमन शंकर निवृत्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही संस्था आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारली आहे.

आज संस्थेचे एकूण ९८७ सभासद असून, शेअर भांडवल ६१ लाख ७ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. संस्थेने २ कोटी ६९ लाखांचे कर्ज वाटप केले असून, ३ कोटी २० लाखांच्या ठेवी सुरक्षित आहेत. तसेच संस्थेची गुंतवणूक १ कोटी १२ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

 संस्थेने सतत ऑडिट अ वर्ग मिळवले असून कायम सभासदांना 12 टक्के लाभांश देणारी दिघंची परिसरातील ही एकमेव संस्था बनली आहे 

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी आमदार श्री. राजेंद्रअण्णा देशमुख भूषवणार असून, प्रमुख पाहुण्या म्हणून आटपाडीच्या असिस्टंट रजिस्टर सौ. सुषमा शिंदे मॅडम उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहतील:

अमरसिंह बापू देशमुख (माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा परिषद)

ब्रह्मानंद पडळकर (माजी समाजकल्याण सभापती, सांगली जिल्हा परिषद)

तानाजीराव पाटील (माजी सभापती समाज कल्याण व संचालक, सांगली जिल्हा बँक)

सौ. माधुरीताई मोरे (लोकनियुक्त सरपंच, दिघंची)

बळवंतअण्णा मोरे (माजी उपसभापती, आटपाडी)

भगवानआप्पा मोरे (व्हाईस चेअरमन)

हनुमंतआप्पा देशमुख (माजी सरपंच)

अनिल शेठ पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात संस्थेच्या वतीने भेटवस्तूंचे वितरणही करण्यात येणार आहे. संस्थेचे चेअरमन सिद्धेश्वर भानुदास मेनकुदळे यांनी "सभासदांच्या आणि ठेवीदारांच्या प्रेमामुळेच आम्ही ५० वर्षांचा हा टप्पा गाठू शकलो" अशा भावना व्यक्त केल्या आहेत. उद्याच्या या सोहळ्यास सर्व ठेवीदार, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...