क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
पंढरपूर / सोलापूर - राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) पंढरपुरात आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. "सरकारला सदबुद्धी मिळावी" म्हणून विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार, खासदार आणि शेतकरी मोर्चापूर्वी विठ्ठल मंदिरात जाणार आहेत.
याबाबतची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. दरम्यान, आजच्या या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील आणि उत्तम जानकर यांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले.
"पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सरकारने दुष्काळ जाहीर करावा यासाठी आक्रोश मोर्चा काढणार आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात पंढरपुरात हा दुष्काळ मोर्चा काढण्यात येणार आहे," अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.
"२६ सप्टेंबर रोजी पंढरपुरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे," असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळ मोर्चाच्या नियोजनाची पंढरपुरात बैठक झाली. यानंतर ते बोलत होते. पवारांच्या मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकीला आमदार उत्तम जानकर आणि आमदार नारायण पाटील यांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले.
"शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळे सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे, जिल्ह्यातील सगळे आमदार, खासदार या मोर्चाबाबत आम्ही नियोजन करू," असेही मोहिते पाटील म्हणाले.
दरम्यान, या मोर्चात राज्यातील महत्त्वाचे नेते देखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
"गेल्या महिन्याभरापासून आम्ही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहोत. सरकार कशाची वाट पाहत आहे हे माहित नाही?" असा सवाल मोहिते पाटील यांनी केला.
"मागेच दुष्काळ जाहीर करणं गरजेचं होतं," असेही मोहिते पाटील म्हणाले.
"सरकारला जाग येत नाही म्हणून आम्ही हा मोर्चा काढणार," अशी माहिती मोहिते पाटील यांनी दिली आहे.
| मुद्दा | तपशील |
| निर्णय | पंढरपुरात आक्रोश मोर्चा |
| नेतृत्व | शरद पवार |
| तारीख | २६ सप्टेंबर |
| मार्ग | शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय |
| मागणी | कोरडा दुष्काळ जाहीर करा |
| विठ्ठल मंदिर | मोर्चापूर्वी दर्शन |
| दांडी | आमदार उत्तम जानकर, नारायण पाटील |
| वक्तव्य | धैर्यशील मोहिते पाटील |

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.