क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
जळगाव - आज अनंत चतुर्दशी आहे. राज्यभर आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. वाजत गाजत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाच्या मिरवणुका सुरू आहेत.
अशातच जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हिंदू-मुस्लिम (Hindu Muslim) ऐक्याचे सुंदर दर्शन पाहायला मिळाले. जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे मुस्लिम बांधवांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
मुस्लिम बांधवांकडून मानाच्या गणपतीची आरती करण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीत बंधुभावाचे दर्शन पाहायला मिळाले.
दर्ग्यावर चादर अन् गणरायाला शुभेच्छा असा ऐक्याचा संदेश या मिरवणुकीत देण्यात आला.
दरम्यान, महानगरपालिका प्रशासन आणि हिंदू बांधवांच्या वतीने आप्पा महाराजांचे परममित्र लालशहा बाबा यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली.
यानंतर मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी गणरायाचे स्वागत केले.
गणेशोत्सव हा हिंदू बांधवांचा पारंपरिक सण असला तरी या उत्सवाच्या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी सहभागी होत गणरायाला शुभेच्छा दिल्या.
या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि परस्पर सन्मानाचा संदेश देण्यात आला. जळगावच्या विसर्जन मिरवणुकीत धार्मिक सलोखा, परस्पर सन्मान आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले.
दरम्यान, घराघरात मोठ्या उत्साहात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सर्वत्र निरोप दिला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातही ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे आज विसर्जन होत आहे. विसर्जनासाठी ठिकठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धाराशिव नगरपालिकेच्या वतीने गणेशमूर्ती संकलनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील प्रत्येक विभागात नगरपालिकेची एक गाडी तैनात करण्यात आली आहे.
प्रत्येक गाडीसोबत दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या गाड्या शहरातील गल्ली-बोळात जाऊन नागरिकांकडून गणेशमूर्ती संकलित करणार आहे.
दरम्यान, पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण पुणे दुमदुमून गेले आहे.
मात्र या उत्सवाच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. तरुण पिढी दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे या तरुणांनी व्यसनापासून दूर जावे आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
नाशमुक्त भारताचा संकल्प करत गणरायाकडे याचसाठी साकडे घालण्यात आले आहे.
| मुद्दा | तपशील |
| दिवस | अनंत चतुर्दशी |
| स्थळ | जळगाव, नांदेड, धाराशिव, पुणे |
| जळगाव | हिंदू-मुस्लिम ऐक्य; मानाच्या गणपतीची आरती |
| दर्गा | लालशहा बाबा दर्ग्यावर चादर |
| धाराशिव | गणेशमूर्ती संकलनासाठी विशेष गाड्या |
| पुणे | व्यसनमुक्तीचा संदेश |
| संदेश | सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान |

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.